Aditi Rao Hydari At Cannes Festival 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditi Rao Hydari : कान्स फेस्टिव्हलमध्ये 'हिरामंडी' तल्या बिब्बोजानचा जलवा, आदितीने फ्रान्समध्ये केला 'गजगामिनी वॉक'

Aditi Rao Hydari At Cannes Festival 2024 : सध्या सोशल मीडियावर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर्षी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी कान्स फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केलं आहे.

Chetan Bodke

सध्या सोशल मीडियावर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर्षी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी कान्स फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केलं आहे. 'हिरामंडी' फेम आदिती राव हैदरी हिने कान्स फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौंदर्याची जादू तिथल्या रेड कार्पेटवर पसरवली आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी अगदी हटक्या अंदाजात उपस्थिती लावलेली होती.

संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'हिरामंडी' वेबसीरीजमध्ये, आदितीने बिब्बोजनचे पात्र साकारले आहे. अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. यावेळी तिने "सैयां हटो जाओ" गाण्यावर हटके रिल शेअर केलेला आहे. सध्या तिच्या ह्या रिलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. यावेळी आदितीने येलो आणि ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड ड्रेस वेअर केलेला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

फ्रान्समधील कान्स शहरातील रस्त्यावर 'हिरमंडी: द डायमंड बाजार'मधील प्रसिद्ध 'गजगामिनी वॉक' करताना ती दिसत आहे. २०२२ मध्ये आदितीने कान्सच्या रेड कार्पेटवर डेब्यू केलं आहे. २०२३ मध्येही तिने आपली जबरदस्त दाखवली होती. यावर्षीही आदितीने आपल्या हटक्या स्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधले. २०२४ च्या कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, नमिता थापर, नॅन्सी त्यागी यांच्यासह अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा मतचोरीचा बॉम्ब, १०० टक्के पुरावे असल्याचेही सांगितले

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT