Karishma Kapoor Children Saam Tv
मनोरंजन बातम्या

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

karishma kapoor children Case: दिल्ली उच्च न्यायालयाने संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूरला सर्व मालमत्ता उघड करण्याचे आदेश दिले. संजय कपूर यांच्या एक्स पत्नी करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला.

Shruti Vilas Kadam

karishma kapoor children: उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेशी आणि वारसाहक्कांशी संबंधित एक खटला दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे. हा सुमारे ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा प्रश्न आहे. संजय कपूर यांची एक्स पत्नी करिश्मा यांच्या मुलांनी मालमत्तेबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने बुधवारी निर्देश देत संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांना संपूर्ण मालमत्तेचा खुलासा करण्यास सांगितले आहे. उद्योगपती संजय यांच्या बहिणीने या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि करिश्मा कपूरच्या मुलांना पाठिंबा दिला.

संजय कपूर यांच्या बहिणीचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास

एएनआयशी बोलताना संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूर स्मिथ म्हणाली, 'मी खूप आनंदी आहे कारण अखेर कुटुंबाला या गोष्टीची माहिती होईल. मला भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, त्यामुळे आशा आहे की कार्टात प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल.

करिश्मा कपूरच्या मुलांना पाठिंबा का दिला

मंधीरा करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेला पाठिंबा देते म्हणाली, 'मी समायरा आणि कियान (करिश्मा कपूरची मुले) यांच्यासोबत उभी आहे. जे लोक समायरा, कियान आणि संजय कपूर यांना ओळखतात त्यांना देखील प्रश्न पडेल की मृत्युपत्रात मुलांचा समावेश का केला गेला नाही. म्हणूनच मी त्यांच्यासोबत उभी आहे.'

या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑक्टोबरमध्ये होईल

करिश्माची मुले मुलगी समायरा कपूर आणि मुलगा कियान यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या कथित मृत्युपत्राला आव्हान देत दाखल केलेली तक्रार उच्च न्यायालयाने नोंदवली आहे. न्यायालयाने संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांना नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

Maharashtra Live News Update: लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव सुरू

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT