Sanjay Dutt & Arshad Warsi To Join Welcome 3: बॉलिवूडमधील अनेक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भरपूर मनोरंजन केले आहे. या विनोदी चित्रपटांना पाहणे कधीही कंटाळवाणे वाटत नाही. त्यातील एक म्हणजे 'वेलकम'. अक्षय कुमार, कतरिना कैफ स्टारर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे.
अक्षय, कतरिना तसेच नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल आणि इतर अनेक कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील प्रत्येक सीनने लोकांना पोट धरून हसायला भाग पाडले.
2007मध्ये 'वेलकम' आणि 2015मध्ये आलेला 'वेलकम 2' देखील प्रेक्षकांना आवडला होता. सध्या बॉलिवूडमध्ये या चित्रपटाच्या तिसर्या भागाविषयी म्हणजेच 'वेलकम 3'विषयी चर्चा सुरू आहे. दरम्यान चित्रपटाच्या कलाकारांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2007 साली कॉमेडीचा तडका देणाऱ्या 'वेलकम'च्या तिसर्या भागाच्या स्टार कास्टबाबत एक मोठी अपडेट समजली आहे. ही बातमी ऐकून तुम्हा सर्वांना धक्का बसेल. या चित्रपटातील कलाकारांची नावे ऐकल्यावर प्रेक्षक म्हणून तुम्हीच या चित्रपटाची खात्री द्याल. हाती आलेल्या बातमीनुसार अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि संजय दत्त 'वेलकम 3' म्हणजेच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहेत.
'वेलकम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाला आधी 'वेलकम टू द जंगल' असे म्हटले जात होते, पण आता या चित्रपटाचे नाव 'वेलकम 3' असणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. हा चित्रपट फिरोज नाडियादवाला दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटात मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त, सर्किट म्हणजेच अर्शद वारसी आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जर काही बदल झाले नाहीत तर अक्षय कुमारचा 'हेरा फेरी 3' नंतरचा हा दुसरा बॅक टू बॅक कॉमेडी चित्रपट असेल.
'हेरा फेरी 3'चे शूटिंग अंतिम टप्प्यात आल्यावर किंवा चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होताच 'वेलकम 3'चे शूटिंग सुरू होईल. मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कोणाकडे असेल हे अद्याप ठरलेले नाही. 'वेलकम 2' चित्रपटाचा अक्षय कुमार भाग नव्हता. या चित्रपटात अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल तसेच श्रुती हासन, जॉन अब्राहम, शायनी आहुजा आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.