Sangeet Devbabhali Marathi Drama 500 Plays Instagram
मनोरंजन बातम्या

Sangeet Devbabhali Drama: कार्तिकी एकादशीच्या दिवशी ‘संगीत देवबाभळी’ निरोप घेणार; ५०० व्या प्रयोगानंतर नाटकाचा प्रवास थांबणार

Sangeet Devbabhali Marathi Drama: कार्तिकी एकादशीच्या दिवशी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Chetan Bodke

Sangeet Devbabhali Marathi Drama 500 Plays

मराठीत चित्रपटासोबतच मराठी नाटकालाही मराठी सिनेसृष्टीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मराठी प्रेक्षकांचे आणि नाटकाचे फारच घनिष्ट संबंध आहे. सध्या मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांकडून ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाटकाचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. २२ डिसेंबर २०१७ पासून सुरु झालेला हा प्रवास २२ नोव्हेंबरला अर्थात उद्या संपणार आहे. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास उद्या संपणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाटकाच्या टीमने नाटकाच्या प्रवासाबद्दल भाष्य केले होते. जवळपास पाच वर्ष मराठी मनावर गारुड केल्यानंतर आम्ही ‘शेवटचे काही प्रयोग’ करीत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. बुधवार, २२ नोव्हेंबर, सायंकाळी ६.३० वाजता षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे ‘संगीत देवबाभळी’चा शेवटचा प्रयोग पार पडणार आहे. आजवर ह्या नाटकाला राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी असे विक्रमी सर्वाधिक ४४ पुरस्कार नाटकाला मिळालेले आहेत.

नाटकाचा उद्या ५०० वा प्रयोग पार पडणार आहे. हा शेवटचा प्रयोग उद्या मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. नवा विषय, नवीन कथा आणि नवे कलाकार या सर्वांना घेऊन प्रेक्षकांसमोर व्यावसायिक रंगभूमीवर नाटक सादर करणे, दिग्दर्शकांसाठी मोठी तारेवरची कसरत होती. अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

वाढत्या प्रदूषणाचा थेट मेंदूवर हल्ला; मुंबईकरांचा श्वास गुदमरला, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT