Sand Artist Sudarsan Pattnaik pays tribute to Lata Mangeshakar Twitter @ANI
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar Death Anniversary: लतादीदींना अनोखी आदरांजली; चाहत्याने साकारलं आकर्षक

प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी लतादीदींना श्रद्धांजली दिली आहे.

Pooja Dange

Lata Mangeshkar 1st Death Anniversary: स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजही त्यांची गाणी आणि आठवणी सर्वांच्या मनात जिवंत आहेत. लता मंगेशकरच्या चाहत्यांनी त्यांना त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी श्रद्धांजली अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी लतादीदींना श्रद्धांजली दिली आहे. ओडिसा येथील पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर सुदर्शन यांनी लता मंगेशकर यांची वाळूपासून मूर्ती साकारली आहे.

लता मंगेशकर यांची ही मूर्ती ६ फूट उंच आहे. तसेच मूर्तीवर लिहिले आहे, 'मेरी आवाज ही मेरी पेहचान है', 'ट्रिब्यूट टू भारतरत्न लता जी'. लता मंगेशकर यांची ही कलाकृती साकारताना सुदर्शन यांनी खूप रंगाचा वापर केला आहे. तसेच त्यांनी ग्रामोफोनचा वापर करत कल्पकतेचा वापर करत ही कलाकृती साकारली आहे.

२००१ साली लता मंगेशकर यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाला होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुगणालयात दाखल करण्यात आले होते. २९ दिवस लता मंगेशकर यांच्या उपचार सुरू होते. परंतु त्या ही लढाई जिंकू शकल्या नाहीत आणि गेल्या वाटही याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर, २०२२ रोजी निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT