Samantha Ruth Prabhu Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: 'ऊ अंटावा गर्ल' सामंथा विकी कौशलसोबत करणार बॉलिवूड एन्ट्री

समंथा रुथ प्रभू सलमान खान आणि आयुष्मान खुरानानंतर आता ती विकी कौशलच्या पुढच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं एक सौंदर्य म्हणजे सामंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu). सामंथाने तेलुगूच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याचबरोबर सामंथाने आपल्या ग्लॅमरस लूकने कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सामंथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. प्रसिद्ध निर्माता दिनेश विजनच्या पुढील चित्रपटातून सामंथा प्रभू आयुष्मान खुरानासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु आता असे बोलले जात आहे की, सामंथा विकी कौशलच्या 'द इमॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटातून पदार्पण करण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, 'द इमॉर्टल अश्वत्थामा'(The Immortal Ashwatthama) या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर सामंथाला या चित्रपटात लीड कास्ट करण्याचा विचार करत आहेत. तसेच आदित्य धर याने या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. सध्या या चित्रपटासाठी कास्टिंग चालू आहे आणि लवकरच या चित्रपटाशी संबंधित नवीन घोषणा करण्यात येईल.

सामंथा आणि आदित्य यांच्यात या चित्रपटाबद्दल पॅाझिटीव्ह बोलणी झाल्यास ती या चित्रपटात अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. सध्या विकी कौशल त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ज्यासाठी त्याला ६-८ महिन्यांचा कालावधी लागेल. हा चित्रपट पूर्ण केल्यानंतरच तो आदित्यच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल, ज्यामध्ये तो सामंथासोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सामंथाने एका वृत्तात म्हटले होते की, लवकरच सामंथा बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'नो एंट्री' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

सामंथा साउथच्या 'यशोदा'या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय ती 'शाकुंतलम' चित्रपटातही दिसणार आहे. सामंथाकडे 'अॅरेंजमेंट ऑफ लव्ह' हा परदेशी चित्रपटही आहे, ज्याचे दिग्दर्शन फिलिप जॉन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं; क्राईम शो पाहून रचला हत्येचा कट

Thane Water Supply : ठाण्यात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा, कारण काय?

Couples In Hotels: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं एकत्र हॉटेलमध्ये राहणं गुन्हा आहे का?

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

SCROLL FOR NEXT