Samantha Ruth Prabhu News Saam tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu News: समंथाचा सिनेसृष्टीतून ब्रेक; निर्मात्यांचे पैसेही केले परत, काय आहे कारण?

Samantha Ruth Prabhu News: समंथाने सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. तिच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samantha Ruth Prabhu News: दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा प्रभू नेहमीच चर्चेत असते. समंथा अभिनयाबरोबर उत्तम न्यृत्यांगणा आहे. याच समंथाने सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. तिच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

समंथा सध्या तिच्या 'सिटाडेल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. समंथा तिच्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. समंथाने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेत निर्मात्यांकडून घेतलेले अॅडव्हान्स पैसे परत केले आहे. समंथाने तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे.

समंथा सध्या विजय देवरकोंडासोबत तेलुगु चित्रपट 'कुशी' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. चित्रपटाचे शुटिंग अंतिम टप्प्यात आहे.यानंतर समंथा तिच्या 'सिटाडेल' चित्रपटाचं शुटिंग संपवणार आहे. या चित्रपटानंतर मात्र समंथा एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. या काळात समंथा तिच्या आरोग्याकडे लक्ष देणार आहे. तसेच ती मायटोसिस या आजारावर उपचार घेणार आहे.

गेल्या वर्षी संमथाने मायटोसिस या आजारचे निदान झाल्यावर काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. मायटोसिस हा दुर्मिळ स्वयंप्रतिकार रोग आहे. त्यामुळे समंथा स्वतः च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते.

गेल्या महिन्यात समंथाने सेरबिया चर्चला भेट दिली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर तिने मागील एक वर्षापासून 'मायटोसिस' कशी झूंज देत आहे, याची माहिती दिली होती. 'मायटोसिस' या आजाराचे निदान होऊन एक वर्ष झाले आहे. माझ्या शरीराशी अनेक लढाया कराव्या लागणार आहेत, अशी माहिती तिने दिली.

दरम्यान, समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, समंथा 'सिटाडेल'या चित्रपटात संमथा आणि वरुण धवन एकत्र झळकणार आहे. तर संमथाचा विजय देवरकोंडासोबतचा 'कुशी' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Shilpa Shinde Comeback: शिल्पा शिंदे परतली? 'भाभी जी घर पर है' शोमध्ये दिसणार खरी 'अंगुरी भाभी'

Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT