लग्नाच्या चार वर्षानंतर टाॅलीवुड मधील प्रसिद्ध कपल चा घटस्फोट Twitter
मनोरंजन बातम्या

लग्नाच्या चार वर्षानंतर टाॅलीवुड मधील प्रसिद्ध कपल चा घटस्फोट

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya),ज्यांनी 2017 मध्ये लग्न केले, त्यांनी शनिवारी वेगळं होण्याची घोषणा केली आहे.

वृत्तसंस्था

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya),ज्यांनी 2017 मध्ये लग्न केले, त्यांनी शनिवारी वेगळं होण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याबाबत अटकळ होती. पण त्या दोघांनीही कोणतीही स्पष्ट घोषणा केली नव्हती. पण आता समंथाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या दोघांच्या या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. सामंथा यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोघेही लवकरच वेगळे होणार आहेत.

समंथाने ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवरुन दिली आहे. त्यात समंथाने लिहिले आहे की '' आमच्या चाहत्यांसाठी. खूप विचारानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. मला माझ्या वैयक्तिक रस्त्यावर चालण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्याशाली आहोत की आमचं नातं एक वर्षाहून अधीक काळ जास्त टिकलं. आम्हाला विश्वास आहे की आमच्यात नेहमी एक नातं कायम टिकून राहिल''. पुढे समंथा लिहिते '' मी माझ्या चाहत्यांना आणि मीडियाला विनंती करते की आम्हाला या काळात मदत करा आणि आम्हाला आमचं वैयक्तिक आयुष्य जगूद्या. तुमच्या समर्थनासाठी धन्यवाद.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी मनम, ये माया चेसावे आणि ऑटोनगर सूर्या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केले. या जोडप्याने दोन विधींनुसार लग्न केले होते, एक दक्षिण भारताच्या विधीनुसार आणि एक ख्रिश्चन धर्मातील विधीनुसार. त्यांनी माजिली या चित्रपटात सोबत काम केले आहे. समंथा रूथ प्रभू पुढे कठुवाकुला रेंदू काळध आणि शकुंतलम मध्ये दिसणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT