Katrina Kaif Review Sam Bahadur Instagram
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Watch Sam Bahadur: ‘संपूर्ण चित्रपटामध्ये तू कुठेच दिसला नाहीस...’; पती विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ पाहून कतरिना कैफ असं का म्हणाली?

Katrina Kaif Post Shared On Sam Bahadur Film: अभिनेत्री कतरिना कैफने पती विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ चित्रपट पाहिला आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

Chetan Bodke

Katrina Kaif Review Sam Bahadur

आज बॉक्स ऑफिसवर मेघना गुलजार (Meghana Guljar) दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur) रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटामध्ये मार्शल सॅम माणेकशा यांचे पात्र अभिनेता विकी कौशलने साकारले आहे.

सध्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडूनही चित्रपटाचे कौतुक होत आहे. नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने पती विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ चित्रपट पाहिला. तिने पोस्टच्या माध्यमातून चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

बुधवारी मुंबईमध्ये, विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग पार पडली. या स्क्रिनिंगवेळी विकी कौशलच्या आई वडीलांसोबत तिनेही हजेरी लावली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत कतरिनाने विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. कतरिना कैफ आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘सॅम बहादुर, मेघना गुलजार दिग्दर्शित काव्यात्मक आणि खूपच सुंदर क्लासिक चित्रपट. दिग्दर्शकाने मांडलेल्या कथेने प्रेक्षकांना थेट फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या काळातच नेले. कथा सांगण्याची स्टाईल आणि प्रत्येक कॅमेरा अँगल खूपच सुंदर. विकी कौशलने चित्रपटामध्ये खूपच सुंदर अभिनय केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी मार्शल सॅम माणेकशा यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवलाय.’

रिव्ह्यूमध्ये पुढे कतरिना म्हणाली, ‘ तुझ्या भारदस्त अभिनयाने आणि चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले. तुला या चित्रपटामध्ये पाहून मला खूपच अभिमान वाटला. गेल्या वर्षापासून मी तुला पाहत आहे, या भूमिकेसाठी तू फार मेहनत घेतली आहे. तू या भूमिकेला खूप चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण चित्रपटामध्ये मला विकी कौशल कुठेच दिसला नाही. तू खूप चांगल्या पद्धतीने फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचे पात्र साकारले. चित्रपटामध्ये तू लक्षात ठेवण्यासाठी कामगिरी केली आहेस.’ (Bollywood Film)

१९७१ मध्ये भारत- पाकिस्तान युद्धामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, मोहम्मद झीशान अयुब, आशिष विद्यार्थी यांसारखे दमदार कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. अनेक वर्ष या चित्रपटावर दिग्दर्शकांनी काम केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT