Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : चुलबुल पांडे 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार नाही, समोर आलं धक्कादायक कारण

Salman Khan Movie : सलमान खानच्या हातातून रोहित शेट्टीचा मोठा चित्रपट गेला. नेमकं कारण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या भाईजान आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बाबा सिद्दिकींच्या मृत्यूनंतर आता सलमान खानला (Salman Khan) ही धमकी येत आहे. बाबा सिद्दिकींच्या निधनानंतर बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली होती. कारण बाबा सिद्दिकी आणि बॉलिवूडचे चांगले कनेक्शन होते. त्यात ही सर्वात जास्त चांगल नातं सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे होते.

सलमान खान आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान 'सिंघम अगेन'मध्ये (Singham Again) दिसणार होता. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ रोल करणार होता. मात्र बाबा सिद्दिकींच्या मृत्यूमुळे भाईजानच्या हातून हा चित्रपट गेला. गेल्या आठवड्यात सलमान खानला 'सिंघम अगेन' मधील कॅमिओ रोलसाठी रोहित शेट्टी बोलवणार होता. मात्र अचानक झालेल्या बाबा सिद्दिकींच्या निधनानंतर रोहित शेट्टींनी (Rohit Shetty) भाईजानसोबत संपर्क साधला नाही.

'सिंघम अगेन' मध्ये सलमान खानची झलक पाहता येणार नाही म्हणून चाहते नाराज आहेत. कारण 'सिंघम अगेन'मध्ये सलमानला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. सध्या सलमान खान बिग बॉसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान 'बिग बॉस18'चं होस्टिंग करत आहे. सलमान खानने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीसोबत हीट चित्रपट केले आहे. सलमान खानचे 'दबंग' खूप गाजले होते. त्याला पोलिसांचा भूमिकेत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता. आता सलमान खानच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

SCROLL FOR NEXT