Salman Khan Watch Dispute Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमान खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; घातलं घड्याळ झाला गुन्हेगार? घड्याळानं शरीयतचं उल्लघंन

Salman Khan Watch Dispute : भाईजान सलमान खान आता नव्या वादात सापडलाय...या वादाला कारण ठरलंय भाईजान सलमान खानचं घड्याळ...या घड्याळावरुन सलमानला का शरीयतचं गुन्हेगार ठरवण्यात आलंय...पाहूया...

Snehil Shivaji

स्नेहील झणके, साम टीव्ही

मुंबई : सिनेसृष्टीत सलमान खान आणि वाद हे समीकरणच झालंय. आता सलमान खाननं शरीयतचं उल्लघंन केल्याचं म्हणत त्यानं माफी मागावी म्हणून मौलाना आक्रमक झालेत. नेमकं सलमान खाननं असं काय केलं पाहुया.

सलमान खाननं प्रभु श्री रामाची प्रतिमा असलेलं घड्याळ घातलं

घड्याळात प्रभु श्री राम आणि हनुमानाची प्रतिमा

सलमाननं घातलेल्या घड्याळाचा रंग भगवा

जेकब अँड कंपनीचं रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2

स्पेशल श्रीराम एडिशनची किंमत 34 लाख रुपये

इतकं मौल्यवान विशेष एडिशनचं महागडं घड्याळ घालून सलमान खाननं फोटो सेशन केलं आणि इथेच माशी शिंकली. ईदच्या दिवशी सिंकदर येत असतांनाच सलमानचंही हे फोटो शूटमुळे पुन्हा वाद झाला कारण या रामाच्या घड्याळामुळे मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी सलमानला शरीयाचा गुन्हेगार म्हणत पश्चाताप करण्याची मागणी केलीये.

सलमान खान गेल्या ३५ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आपली कारकिर्द गाजवतोय. मात्र बॉलीवुडच्या या भाईजानच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते त्यापेक्षा अधिक चर्चा त्याच्यासोबत घडलेल्या वादाची जास्त होते. सलमान खाननं घरी गणपती बसवल्यामुळे देखिल अशाच मौलानांना याआधी देखिल पोटशूळ उठला होता. आई हिंदू आणि वडिल मुस्लिम अशा घरात वाढलेला सलमान हा धार्मिक सलोखा ऐक्य जपत आल्याचं दिसलंय आणि बहुदा त्याचमुळे सलमान खान हा कायम कट्टरपंथियाच्या निशाण्यावर असल्याचं दिसलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: IPL 2026 : मिचेल सँटनर IPL बाहेर; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हुकमी एक्का

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

8th Pay Commission: शिक्षकांची बेसिक सॅलरी १.३४ लाख होणार? आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

SCROLL FOR NEXT