Salman Khan Wanted Child  Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Interview: भाईजान सलमानला व्हायचयं बाबा, पण येतोय अडथळा

Salman Khan Wanted Kid: सलमानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

Pooja Dange

Salman Khan Wanted To Become Dad: बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. दरम्यान सलमान खानची एक मुलखात सगळीकडे व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये सलमानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

या मुलाखतीत सलमान म्हणाला की, तो खूप दिवसांपासून वडील बनण्याचा विचार करत आहे आणि त्याला मुलांवर खूप प्रेम आहे. याशिवाय सलमानने त्याच्या लग्नाबद्दलही सांगितले.

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला की, त्याने एकदा मूल दत्तक घेण्याचा विचार केला, पण भारतीय कायद्यानुसार त्याला परवानगी मिळत ​​नाही.

सलमान खानचे मुलांवर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोंमध्ये काही फोटो असे आहेत ज्यामध्ये सलमान त्याच्या पुतण्यांसोबत वेळ घडवताना दिसत आहे. सलमानची बहीण अर्पिता शर्मा हिला आयत शर्मा आणि अहिल अशी दोन मुले आहेत. सलमानची दुसरी बहीण अलविरा खान हिलाही अलीझेह आणि अयान नावाची दोन मुले आहेत. त्याचबरोबर सलमानचे भाऊ सोहेल आणि अरबाज यांनाही मुले आहेत. (Latest Entertainment News)

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खान मुलांच्या प्लॅनिंगबद्दल सांगताना म्हणाला- 'आता काय सांगू, तो प्लान होता, सुनेचा प्लॅन नव्हता, मुलाचा होता, पण. भारताच्या कायद्यानुसार असे होऊ शकत नाही, त्यामुळे आता काय करायचे ते पाहू.'

करण जोहर दोन मुलांचा पिता आहे त्याबाबत सलमान खान म्हणाला, 'मीही तसाच प्रयत्न करत होतो पण तो कायदा कदाचित बदलला आहे, त्यामुळे आता बघू. मला मुलांची खूप आवड आहे. मला मुलं आवडतात. पण मुलं आली की आई पण येते. आई त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. आमच्या घरी भरपूर आया आहेत साहेब! आमच्याकडे संपूर्ण जिल्हा, संपूर्ण गाव आहे, ते त्या मुलांची चांगली काळजी घेतील, परंतु त्याची आई, त्याची खरी आई असेल, ती माझी पत्नी असेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का? काय सांगतात नियम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद

Budhwar che Upay : बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाचे 'हे' उपाय करा; नशीब बदलण्यास वेळ लागणार नाही

Shravan 2025: श्रावण महिन्यात शिवलिंगावर कसे अर्पण करावे बेलपत्र? जाणून घ्या योग्य पद्धत

Sangli Crime: सांगली हादरली! दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, घाबरलेल्या मुलीनं संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT