Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: बॉलिवूडमध्ये रंगला नवा ड्रामा; रणवीर सिंग आणि फरहान अख्तरच्या वादात सलमान खानची एन्ट्री

Salman Khan: ‘डॉन 3’ वादात सलमान खानने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘डॉन 3’ चित्रपटाशी संबंधित मोठ्या वादाच्या अडकला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याच्या अवघ्या काही आठवडे आधी रणवीरने या प्रकल्पातून माघार घेतल्याने निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणानंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ने रणवीर सिंगविरोधात ‘असहकार’ निर्देश जारी केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

दरम्यान, या वाढत्या वादात आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने एन्ट्री केल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तांनुसार, सलमान खान रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील मतभेद मिटवून प्रकरण शांततेत सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलीवूडमधील महत्वाचा व्यक्ती असल्यामुळे सलमान दोन्ही बाजूंना समजावून सांगत असल्याचे बोलले जात आहे.

एका रिपोर्टनुसार, सलमान खानने रणवीर सिंग आणि फरहान अख्तर या दोघांशी एकट्यात चर्चा केली आहे. रणवीरबद्दल त्याच्या मनात आदर असून अख्तर कुटुंबाशीही त्याचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे हा वाद अधिक वाढू नये आणि त्याचे ‘मीडिया सर्कस’मध्ये रूपांतर होऊ नये, म्हणून सलमान मध्यस्थी करत आहे. याआधी आमिर खाननेही दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. आता सलमान खानही या प्रकरणात पुढे आल्याने दोन्ही पक्षांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितले की, ‘डॉन 3’च्या तयारीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. चित्रीकरणाची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती, हॉटेल बुकिंग आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. अशा परिस्थितीत रणवीरने अचानक चित्रपट सोडल्याने निर्मात्यांना सुमारे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

सध्या रणवीर सिंग आणि फरहान अख्तर या दोघांनीही सलमान खानच्या सल्ल्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. आता या वादावर अंतिम तोडगा कधी निघतो, याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT