Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीला न जुमानता सलमान खानने सुरू केलं Bigg Boss चं शूटिंग, भाईजानच्या सुरक्षेसाठी ६० रक्षक तैनात

Salman Khan : बाबा सिद्दिकींच्या निधनानंतर आता सलमान खानलाही लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली आहे. तरी देखील सलमान खानने धमक्यांना न जुमानता बिग बॉसचं शूटिंग सुरू केलं आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' ची (Bigg Boss 18) चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस घरातील वाद वाढतच जात आहेत. पहिल्या आठवड्यात गुणरत्न सदावर्ते यांनी घरात राडा घातला होता. मात्र कोर्टाच्या केसमुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून अचानक बाहेर जावे लागले.

बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर सलमान खानने (Salman Khan) शूटिंग रद्द केलं होतं. आता भाईजानला देखील लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळत आहेत. त्याच्या जीवाला धोका आहे. पण आता या धमक्यांना न जुमानता सलमान बिग बॉसच्या वीकेंडच्या वारचं शूटिंग सुरू केलं आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असून त्याच्याकडे ५ कोटींची मागणीही करण्यात आली आहे. अस सर्व असतानाही सलमान खान न घाबरता बिग बॉसचं शूटिंग करत आहे.

बिग बॉसच्या ट्विटर अकाऊंटवर सलमान वीकेंडच्या वारचं शूटिंग करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, "बिग बॉस वीकेंड का वारचं शूट लवकरच सुरू होत आहे. सलमान खान सेटवर पोहोचला आहे."

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिग बॉसच्या सेटवर कडक बंदोबस्त केला आहे. भाईजानच्या सुरक्षेतेसाठी तब्बल ६० सिक्युरिटी गार्ड बिग बॉसच्या सेटवर असणार आहेत.

आता 'वीकेंड का वार' मध्ये काय पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या आठवड्यात कोण घराचा निरोप घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT