Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : ४०० कोटींच्या चित्रपटासाठी भाईजानने घेतली चेन्नईत ट्रेनिंग, एका सेटसाठी कोट्यवधींचा खर्च!

Sikandar Movie : भाईजान सध्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलवर काम सुरू आहे. या चित्रपटाच्या एका सेटसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे.

Shreya Maskar

सलमान खान (Salman Khan ) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. लवकरच सलमान खानचा सिकंदर (Sikandar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सिकंदर' हा चित्रपट 2025 च्या ईदमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एआर मुरुगादास हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तसेच साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू झाले आहे. दुसऱ्या शेड्युलसाठी बांधलेल्या सेटवर निर्मात्यांनी करोडो रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खान या चित्रपटामध्ये तुम्हाला ॲक्शन सीक्वेन्स करताना पाहायला मिळणार आहे. या ॲक्शन सीन्ससाठी भव्य सेट उभारले जाणार आहे. एका सेटवर निर्मात्यांनी किती पैसे खर्च केले जाणून घेऊयात.

किती कोटी रुपये खर्च?

मीडिया रिपोर्टनुसार, सिकंदर चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईमध्ये होणार आहे. यात मुंबईतील धारावी आणि माटुंग्याचा समावेश आहे. येथे बांधण्यात आलेल्या मोठ्या सेटसाठी 15 कोटी रुपये खर्च आला आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. 45 दिवसांच्या शूटिंगसाठी एवढा महागडा सेट बांधला जात आहे. यादरम्यान, सलमान खान अनेक हाय-ॲक्शन सीन करणार आहे.

सेट ऑथेंटिक करण्यासाठी निर्मात्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. या शेड्यूलमध्ये केवळ ॲक्शनच नाही तर भावनिक सीन्सही शूट केले जाणार आहेत. चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई (Mumbai) शूट पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरच्या आसपास चित्रपटाचे तिसरे शेड्यूल सुरू होईल. चित्रपटाचे तिसरे शेड्यूल हैदराबादमध्ये होणार आहे. या चित्रासाठी सलमान खान चेन्नईत (Chennai )ट्रेनिंग घेण्यासाठी आला होता. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. हैदराबादमधील शूटिंग एका महालात होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

अ‍ॅटली चित्रपट

बॉलीवूड स्टार शाहरुखनंतर आता अ‍ॅटली या चित्रपटात भाईजानची एण्ट्री होणार आहे. या चित्रपटात टायगर विरुद्ध पठाण तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

SCROLL FOR NEXT