salman khan sikandar Movie Bam Bam Bhole song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sikandar Song: 'बम बम भोले...'; होळीत चढणार सलमानच्या स्वॅगचा रंग; 'सिकंदर'चे नवीन गाणे प्रदर्शित

Bam Bam Bhole New Song Released: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटातील 'बम बम भोले' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे होळीचे गाणे आहे. व्हिडिओमध्ये सलमान होळीच्या रंगात रंगलेला दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Sikandar Song: ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण ईदच्या आधी त्याने त्याच्या चाहत्यांची होळी खास बनवली आहे. त्याने सिकंदर या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले आहे, जे खास होळीसाठी तयार करण्यात आले गाणे आहे. गाण्याचे नाव 'बम बम भोले' आहे. या गाण्यात सलमान देखील होळीच्या रंगात रंगलेला दिसत आहे.

या गाण्यात होळीचा आनंद लुटताना लोक दिसत आहे. भाईजान देखील होळीच्या रंगात रंगला आहे. या गाण्यात त्याची स्वॅग स्टाईलही दिसते. हे या चित्रपटातील दुसरे गाणे आहे. काही दिवसांपूर्वीही त्याचे 'जोहरा जबीन' हे एक गाणे रिलीज केले. त्या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. आता असे दिसते की होळीच्या निमित्ताने त्याचे नवीन गाणे हिट होणार आहे.

'सिकंदर' हा या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. लवकरच या चित्रपटाची प्रतीक्षा संपणार आहे. निर्मात्यांनी आधीच सांगितले आहे की हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. पण तरिही या चित्रपटाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. यामध्ये त्याचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आहे.

साजिद नाडियाडवालाने 'सिकंदर' बनवला

नाडियादवाला ग्रँडसन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे आणि एआर मुरुगदास हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मुरुगदासने आमिर खानचा 'गजनी' चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिकंदर या चित्रपटात प्रभासच्या 'बाहुबली' चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणारा सत्यराज देखील आहे. या चित्रपटात त्याने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT