Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात डबल एलिमिनेशनचा धमाका, दिग्विजयनंतर 'या' दोन सदस्यांची एक्झिट

Yamini-Edin Eliminated :'बिग बॉस 18'चा गेम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गेम अधिकच रंजक होत जात आहे. बिग बॉसच्या घरातून दिग्विजयनंतर दोन सदस्यांचा पत्ता कट झाला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) गेम दिवसेंदिवस मनोरंजक होत जात आहे. सर्वजण बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी बिनधास्त खेळताना दिसत आहे. बिग बॉसचा हा १२वा आठवडा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 18'चा अंतिम सोहळा 19 जानेवारीला पार पडणार आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात मिड वीक डबल एविक्शन झाले आहे.

दिग्विजय राठीच्या नंतर घरातून दोन सदस्य बाहेर पडले आहेत. दिग्विजयच्या घरातील एक्झिटमुळे भाईजान सलमान खानने (Salman Khan) घरातील सदस्यांची शाळा घेतली. दिग्विजयनंतर घरातील चार सदस्य नॉमिनेटेड झाले होते आणि त्यातून दोन सदस्य घराबाहेर गेले. नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये चाहत पांडे, ईशा सिंह, एडिन रोज आणि यामिनी मल्होत्रा यांचा समावेश होता. या चौघींमधून एडिन रोज (Edin Rose) आणि यामिनी मल्होत्रा (Yamini Malhotra) घरातून बाहेर गेल्या आणि चाहत पांडे आणि ईशा सिंह सुरक्षित झाल्या.

बिग बॉसच्या घरातून एडिन आणि यामिनी घराबाहेर गेल्यामुळे कशिश खूपच भावुक होते. घरातून बाहेर जाताना यामिनी करण वीरला एक खास सल्ला देते. ती म्हणते की, "चुम दरांगसोबत लग्न कर... यापेक्षा चांगली मुलगी भेटणार नाही..." या दोघींनीही घरातील सदस्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

बिग बॉसच्या घरात आता एकूण 11 सदस्य राहिले आहेत. आता पुढे बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच 'बिग बॉस 18' चा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी आता फक्त काहीच दिवस बाकी आहेत. या आठवड्यात टाइम गॉड कोण होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT