Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : रोहित शेट्टीनं केली करण वीरची कानउघडणी, रागावून म्हणाला...

Rohit Shetty Angry On Karan Veer Mehra : 'बिग बॉस 18' वीकेंड का वार रोहित शेट्टी आणि एकता कपूर होस्ट करत आहे. यांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली आहे. आता तर रोहित शेट्टीने करणवीर मेहराची चांगलीच कानउघडणी केली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' मध्ये (Bigg Boss 18) रोज एक नवीन ट्विस्ट येत आहे. बिग बॉसचा हा आठवडा देखील मनोरंजनाने भरपूर होता. मात्र या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान पाहायला मिळणार नसल्यामुळे चाहते खूप नाराज आहेत. मात्र भाईजान नसला तरी घरातील सदस्यांची शाळा घेतली जात आहे. सदस्यांना खडे बोल सुनावण्यासाठी 'वीकेंड का वार' एकता कपूर (Ekta Kapoor) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty ) होस्ट करत आहेत. यांनी घरातील सदस्यांची कानउघडणी करायला सुरूवात केली आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी करण वीर मेहरावर (Karan Veer Mehra) भडकलेला पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टी करण वीरला बोलतो की, "घरात एखादी समस्या असली तर तू त्यात लक्ष देत नाहीस. तू मागून फक्त मजा घेत असतो." तेव्हा मध्येच श्रुतिका बोलू लागते. त्यामुळे करण वीर श्रुतिकावर भडकतो. पुढे करणवीर बोलतो की, "मी कोणाच्या वैयक्तिक भांडणांमध्ये पडत नाही." यावर रोहित शेट्टी बोलतो की, "करण तुझ्या गेममुळे तुझेच नुकसान होत आहे. तू गेममध्ये दिसत नाही आहे. "

'बिग बॉस 18' च्या घरात या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तर एकता कपूर आणि रोहित शेट्टी सदस्यांची कशी शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. एकता कपूरने विवियन आणि रजत दलालचा क्लास घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

SCROLL FOR NEXT