Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: कोणाची संधी हुकली अन् कोण झाला बिग बॉसच्या घराचा नवा 'टाइम गॉड', नेमकं काय घडलं?

Rajat Dalal : 'बिग बॉस 18' च्या घरात 'टाइम गॉड'चा टास्क पार पडला. यात कोणी बाजी मारली जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' च्या (Bigg Boss 18) घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. घरातील सदस्य घरात टिकून राहण्यासाठी भन्नाट गेम खेळत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात 'टाइम गॉड' चा टास्क पार पडला. या टास्कमध्ये दिग्विजय राठी (Digvijay Singh Rathee ) आणि रजत दलाल (Rajat Dalal) यांमध्ये मोठे भांडण झाले.

'टाइम गॉड' च्या टास्कमध्ये निणर्य घेण्याचे सर्व अधिकार बिग बॉसने ईशा सिंहला दिले होते. टास्कनुसार ईशाला स्पिन व्हील फिरवून टाइम गॉडच्या शर्यतीत कोण भाग घेणार हे ठरवायचे होते. यानंतर सदस्याला डॉमिनोजची भिंत बनवायची होती. अविनाश, विवियन, करणवीर मेहरा आणि चाहत पांडे या कोणालाच भिंत बनवता आली नाही. त्यानंतर टाइम गॉडचा टास्क दोन सदस्यांमध्ये घेण्यात आला. यात स्पिन व्हील फिरवल्यावर रजत दलाल आणि दिग्विजय राठी यांचे नाव आले.

रजत दलाल आणि दिग्विजय राठी यांच्या दोन्ही गटाने भिंत लावण्याचा खूप प्रयत्न केला. ज्यात रजत दलाल आणि दिग्विजय राठी यांच्यामध्ये हातापायी तसेच भांडण देखील झाले. अखेर विवियन दिग्विजयला घेऊन स्विमिंग पूलमध्ये पडतो आणि रजत दलाल टाइम गॉड बनतो.

टास्कमध्ये निणर्य घेण्याचे सर्व अधिकार ईशाला असल्यामुळे ईशा रजत 'टाइम गॉड' बनल्याचे सांगते. कारण गेम सुरू असताना करणवीर मेहराने रजतची रचलेले डॉमिनोजची भिंत रागात फेकून देतो. त्यामुळे ईशा बोलते की, करणवीर मेहराने नियमांचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे ईशा रजतला 'टाइम गॉड' जाहीर करते.

या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि सलमान खान घरातल्या सदस्यांची कशी शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपूर रामदासपेठेतील नामांकित हॉटेलमधील एमडी पार्टीवर पोलिसांची धाड

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT