Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: फॅमिली वीकमध्ये मोठा धमाका, 'या' सदस्याचा प्रवास थांबला

Kashish Kapoor : बिग बॉसच्या घरात सध्या फॅमिली वीक पार पडला. अशात आता घरातील एका सदस्याचा बिग बॉसमधून पत्ता कट झाला आहे. एविक्शनमध्ये कोणी घेतला घराचा निरोप जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. जानेवारीत या शोचा फिनाले पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक पार पडला. घरातील स्पर्धकांचे कुटुंबातील सदस्य बिग बॉसच्या घरात येत आहे. यात अनेकांची आई, काहींची बायको तर काहींची बहीण आली. खूप दिवसांनी घरातील सदस्यांना भेटून स्पर्धक खूप भावुक झाले.

फॅमिली वीकनंतर बिग बॉसच्या घरात पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. त्यातच बिग बॉसने एविक्शन जाहीर केले. ज्यात घरातील एका सदस्याचा प्रवास थांबला. ज्यामुळे अनेकांना वाईट वाटले. हे एविक्शन फॅमिली वीकनंतर अनपेक्षित होते. घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत शेवटी ईशा सिंह आणि कशिश कपूर (Kashish Kapoor) या दोघी होत्या.

सर्वात कमी वोट मिळाल्यामुळे कशिश कपूरची बिग बॉसच्या घरातून एक्झिट येते. शेवटच्या टप्प्यावर येऊन बिग बॉसच्या घरातून जाऊ लागल्यामुळे कशिशला खूपच वाईट वाटते. चाहत पांडे या आठवड्यात सुरक्षित आहे. कशिश कपूर ही वाइल्ड कार्ड स्पर्धक होती. दिग्विजय सिंह राठीसोबत तिची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती.

आता बिग बॉसमध्ये 'वीकेंड का वार'मध्ये काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'वीकेंड का वार'मध्ये शेवटपर्यंत अजून कोण घराबाहेर पडणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 'बिग बॉस 18' ची ट्रॉफी कोण उचणार हे आता लवकरच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT