Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: ग्रँड फिनालेला येऊन 'या' स्पर्धकाचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का

Eisha Singh : 'बिग बॉस 18' चा ग्रँड फिनाले सुरू झाला असून नुकतेच फिनालेचे पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. शेवटच्या टप्प्यावर येऊन ईशा सिंह घराच्या बाहेर गेली आहे.

Shreya Maskar

आज (19 जानेवारी)ला 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) या सलमान खानच्या शोचा ग्रँड फिनाले पार पडत आहे. 'बिग बॉस 18' हा सीझन 6 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोने तब्बल तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'बिग बॉस 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता.

बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला 6 सदस्य गेले. त्यातील एका सदस्यांचा फिनालेला येऊन प्रवास थांबला आहे. ही सदस्य दुसरी तिसरीू कोणी नसून ईशा सिंह (Eisha Singh) आहे. बिग बॉसच्या घरातून ग्रँड फिनालेला पहिली एक्झिट ईशा सिंहची झाली आहे.

टॉप 5ची यादी

  1. विवियन डिसेना

  2. करणवीर मेहरा

  3. अविनाश मिश्रा

  4. रजत दलाल

  5. चुम दरांग

ईशा सिंहने सुरूवातीपासून बिग बॉसच्या घरात आपल्या गेमने चाहत्यांची मने जिंकली होती. बिग बॉसच्या घरात ईशा आणि अविनाश मिश्राची चांगली मैत्री पाहायला मिळाली. कायम हे दोघे एकमेकांसाठी उभे राहिलेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या शेवच्या दिवसात ईशाला खूप नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. मात्र तिचा चाहता वर्ग तिच्यासोबत कायम होता. तसेच अविनाशने ईशाची साथ कधीच सोडली नाही.

आता 'बिग बॉस 18'चे पाच सदस्य उरले आहेत. यातील कोणत्या सदस्याचा प्रवास येथे थांबणार आणि शेवटी ट्रॉफी कोण उचलणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT