Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया...' ग्रँड फिनालेला स्पर्धकांचा जलवा, पाहा VIDEO

Karanveer-Chum VS Avinash-Eisha Dance : बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला आता काही तास उरले आहेत. फिनालेला बिग बॉसच्या घरातील जोड्या आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणार आहेत. त्यांच्या डान्सची एक झलक पाहा.

Shreya Maskar

आज (19 जानेवारी)ला 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) या सलमान खानच्या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या ग्रँड फिनालेला आता काही तास उरले आहेत. 'बिग बॉस 18' हा सीझन 6 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोने तब्बल तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'बिग बॉस 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली.

आज बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला 6 सदस्य उरले आहेत.

टॉप 6ची यादी

  1. विवियन डिसेना

  2. करणवीर मेहरा

  3. अविनाश मिश्रा

  4. रजत दलाल

  5. ईशा सिंह

  6. चुम दरांग

'बिग बॉस 18' च्या ग्रँड फिनालेला घरातील सदस्य आपल्या खास अंदाजाने चाहत्यांना घायाळ करणार आहेत. बिग बॉसच्या 100 दिवसांच्या प्रवासात घरात अनेक सदस्यांची नाती जुळतात. काहींचे प्रेमाचे, काहींचे मैत्रीचे तर काही लोकांचे येथे शत्रूही होतात. तसेच बिग बॉसच्या या सीझनमध्ये आपल्याला सुरूवातीपासून अविनाश मिश्रा (Avinash Mishra) आणि ईशा सिंह (Eisha Singh) यांची जोडी पाहायला मिळाली. याच्यातील केमिस्ट्रीने तर चाहत्यांना वेड लावले.

दुसरीकडे शो जेव्हा संपत आला तेव्हा करणवीर मेहरा (Karanveer Mehra ) आणि चुम दरांगमध्ये (Chum Darang) घट्ट मैत्री होताना पाहायला मिळाली. या दोन्ही जोड्या बिग बॉसच्या फिनालेला आपल्या धमाकेदार आणि रोमँटिक डान्सने चाहत्यांना वेड लावणार आहेत. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अविनाश-ईशा आणि करणवीर-चुम एकत्र 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळाले आहेत.

प्रोमोमध्ये ऐकू येते की, अविनाश-ईशासाठी बिग बॉस म्हणतात की, 'कभी हा तो कधी ना' तर करणवीर-चुमसाठी बोलतात की, 'कभी दोस्ती या कभी प्यार'बिग बॉसच्या संपूर्ण शोमध्ये यांचा लव्ह अँगल पाहायला मिळला आहे. आज रात्री 'बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले रात्री 9.30 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे.यात सलमान खान (Salman Khan) 'बिग बॉस 18'चा विजेता घोषित करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT