Tiger 3 Emraan Hashmi New Poster @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Emraan Hashmi New Poster: नजरेमध्ये दहशत अन् वाढलेले केस, ‘टायगर ३’मधील इमरान हाश्मीचा खतरनाक लूक प्रदर्शित...

Tiger 3 News: चित्रपटामध्ये सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मीने प्रमुख भूमिका साकारली असून त्याने व्हिलनचे पात्र साकारलेय.

Chetan Bodke

Tiger 3 Emraan Hashmi New Poster

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif)चा आगामी चित्रपट ‘टायगर ३’च्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही वेळातच ट्रेलरला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. निर्मात्यांकडून आतापर्यंत एका अभिनेत्याचा लूक रिव्हिल करण्यात आला नव्हता. तो अभिनेता म्हणजे, इमरान हाश्मी. चित्रपटामध्ये इमरान हाश्मीने प्रमुख भूमिका साकारली असून त्याने व्हिलनचे पात्र साकारलेय.

कतरिना कैफ, सलमान खान आणि इमरान हाश्मी स्टारर ‘टायगर ३’च्या मनोरंजक ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. ॲक्शन आणि सस्पेन्स थ्रिलरचे अप्रतिम मिश्रण घेऊन चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलरनंतर आता चाहते चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, चित्रपटामध्ये सलमान रॉ एजंट टायगर आणि कतरिना आयएसआय एजंट झोयाच्या भूमिकेत दिसणार असून नुकतंच निर्मात्यांनी इमरान हाश्मीचा लूक प्रदर्शित केला आहे.

इमरान हाश्मीचा ‘टायगर ३’ मधला फर्स्ट लूक अखेर समोर आला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी एका खतरनाक व्हिलनच्या भूमिकेचे पात्र साकारणार आहे. “आतिशसोबत दिवाळीमध्ये आतिषबाजी होणार... भारी पडणार टायगर” अशा आशयाचे कॅप्शन देत सलमान खानने इन्स्टाग्रामवर इमरान खानचे पोस्टर शेअर केले आहे. इमरान हाश्मीच्या लूकबद्दल सांगायचे तर, नजरेमध्ये दहशत, अंगावर काळा कोट, वाढलेले केस आणि हातात रायफल असा लूक अभिनेत्याचा चित्रपटामध्ये आहे.

मनिष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ येत्या १० नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. हे दोन्ही भाग सुपरहिट ठरले होते. आता तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ रिलीज होणार असून हा भाग देखील सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT