Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Instagram Post: जवळच्या व्यक्तीच्या निधनानं सलमान खानला झालं दु:ख, इन्स्टावर केली भावुक पोस्ट

सलमानच्या एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Salman Khan Instagram Post: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. कधी त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे तर कधी त्याला मिळालेल्या धमकीमुळे बराच चर्चेत आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी दिलासादायक कमाई केली नसली तरी सलमान या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला.

पण यावेळी सलमान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमानवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्या एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

सलमान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, पण नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपल्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले, 'माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना मला दिलेल्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. नेहमी तुझ्यावर प्रेम केले माझ्या लाडक्या अद्दूच्या आत्म्याला शांती लाभो. त्याच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट बॉक्स मध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. (Bollywood)

सलमानची ही पोस्टपाहून त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले. ही महिला कोण?, तुझं आणि तिचं नातं काय?, सलमान तिला अद्दू नावाने का हाक मारतो? अशे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना सध्या पडले. एकानं तर सलमानच्या जवळच्या कुण्या व्यक्तीचे तर निधन झाले नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला आहे. इंस्टावरुन व्हायरल झालेली ती पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Bollywood Actor)

सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी की जान’च्या प्रदर्शनानंतर बराच चर्चेत आहे. सलमानसोबतच चित्रपटात पूजा हेगडे, जगपती बाबू, शहनाज गिल, राघव जुयाल, जस्सी गिल आणि इतर स्टार्स असलेल्या या सिनेमाने आता 11 दिवसांत 97.25 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच या चित्रपटाने अद्याप 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाप्पाच्या दर्शनाला राजकीय पुढाऱ्यांनी ४ नंतर येऊ नका

आमदार मिटकरींचा हटके 'फ्रेंडशिप डे', चक्क झाडाला बनवलं मित्र, म्हणाले- मित्र हा जीवनात सापासारखा...|VIDEO

Pear Benefits: पेर खाण्याचे फायदे काय?

Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणी परत येणार? खासदारानं कोल्हापूरकरांना दिली आनंदाची बातमी

लाडकी बहीण योजनेसंदर्भात 'या' लिंकपासून सावध राहा; होऊ शकतो स्कॅम

SCROLL FOR NEXT