Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'माझं नाव खराब होतंय...'; 'काला हिरण' चित्रपटावरून सलमान खान भडकला, थेट कोर्टात ठोकली धाव!

Salman Khan: ‘काला हिरण’ चित्रपटात नाव वापरल्याचा आरोप करत सलमान खानने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. राजस्थानातील प्रलंबित प्रकरणाचा हवाला देत आक्षेप अभिनेत्याने आक्षेप घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान प्रसिद्ध अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर त्याच्या नावाशी संबंधित एका वादग्रस्त चित्रपटाविरोधात उचललेल्या कायदेशीर पावलांमुळे. ‘काला हिरण : द बॅटल फॉर लेगसी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना सलमान खानच्या कायदेशीर टीमने नोटीस पाठवली असून चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 1998 मधील चर्चित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद आणि त्यासंबंधित घटनांना सिनेमॅटिक स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सलमान खानच्या वकिलांनी असा दावा केला आहे की, राजस्थान उच्च न्यायालयात काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू असताना चित्रपटात त्याचे नाव वापरणे अयोग्य आहे. त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी नोटीस पाठवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ‘काला हिरण’ हा कोर्टरूम ड्रामा आणि क्राइम थ्रिलर प्रकारातील चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशातील विविध भागांत करण्यात आले असून लवकरच त्याचा टीझर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू होती. मात्र सलमान खानच्या कायदेशीर कारवाईनंतर चित्रपटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काळवीट शिकार प्रकरण हे सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रकरणांपैकी एक आहे. या प्रकरणात विविध न्यायालयीन सुनावणीनंतरही अजून खटला सुरू आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल अशा प्रकारे चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका सलमानच्या बाजूने घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT