सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत; फसवणुकीचा आरोप ! Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Gets Threat : सलमान खानला 'रॉकी' भाईकडून जीवे मारण्याची धमकी, तारीखही सांगितल्याने एकच खळबळ

Salman Khan Life Threat: फोनद्वारे सलमानला धमकी देण्यात आली आहे.

Pooja Dange

सचिन गाड

Salman Khan Gets Another Death Threat : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदी जीवे मारण्याची धमी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्वरक्षणासाठी सलमानने खास बुलेटप्रुफ गाडी परदेशातून मागवली होती. मात्र आता सलमानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीनंतर तपास सुरु केला आहे.

सलमानला यावेळी मिळालेल्या धमकीत हल्ल्याची तारीखही सांगण्यात आली आहे. फोनद्वारे सलमानला ही धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख ही रॉकी भाई, गौरक्षक जोधपूर राजस्थान अशी सांगितली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ९ वाजता हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

फोन करणाऱ्या व्यक्तीने सलमान खानला तो ३० तारखेला मारणार असल्याचे सांगितले. याआधी देखील सलमान खान इमेलद्वारे धमकी आली होती. धमकीचा ईमेल त्याच्या मॅनेजरच्या मेलवर आला होता.

सलमान खानला आलेल्या हा धमकीचा कॉल १६ वर्षीय मुलाने केला होता. शहापूर, ठाणे येथे या मुलाच्या कॉल प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हा मुलगा मुळचा राजस्थानला राहणारा आहे. त्याने हा कॉल का केला यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. "मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगून ठेवा" असे या मुलाने पोलिसांना कॉलवर सांगितले आहे.

याआधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपविण्याची धमकी दिली होती. काळवीट मारल्याप्रकरणी सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितल्यानंतरच हे प्रकरण संपेल, असे देखील लॉरेन्स बिश्नोईने म्हटले होते. सलमानला जीवे मारणे हे त्याचे ध्येय असल्याचे सुद्धा त्याने सांगितले होते. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत करण्यात वाढ करण्यात आली आहे.

सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त. त्याचा 'किसी का भाई किसी कि जान' हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला फक्त युट्युबवर अवघ्या १५ तासात ८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT