KKBKKJ 2nd Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

KKBKKJ Box Office Collection: सलमान खानच्या चित्रपटाची तुफान कमाई; वीकएंड कलेक्शन ५० कोटींच्या पार

Salman Khan Movie Box Office Collection: 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाची सुरुवात उत्तम झाली.

Pooja Dange

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Weekend Collection: सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. सलमानच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. 'किसी का भाई किसी की जान'ने चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगला गल्ला जमवला. आता या चित्रपटाचे पहिले वीकेंड कलेक्शनही समोर आले आहे.

४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान खानने यंदाच्या ईदला त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपट प्रदर्शित केला आहे. त्यामुळे सलमानच्या या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान' प्रदर्शित होण्याआधी सलमानने चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. आता त्याचे चीज होत आहे.

21 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाची सुरुवात उत्तम झाली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 15 कोटी 81 लाखांची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. 'किसी का भाई किसी की जान'ने शनिवारी 25 कोटी 75 लाखांचा व्यवसाय फक्त भारतात केला आहे.

सलमान खानचा मल्टीस्टारर चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांना टक्कर देत आहे. यामध्ये अजय देवगणचा 'भोला' आणि साऊथ स्टार नानीचा 'दसरा' यांचा समावेश आहे. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी इतर चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे.

वीकेंडलाही 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, KKBKKJ ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी 25 कोटी 75 लाख ते 26 कोटी 75 लाखांपर्यंत व्यवसाय केला. 'किसी का 'भाई किसी की जान'ने देशभरात सुमारे 67 कोटी 31 लाखांचे कलेक्शन केले आहे.

'किसी का भाई किसी की जान'मध्ये सलमान खान आणि जगपती बाबू यांच्यासह पूजा हेगडे, भूमिका चावला, भाग्यश्री, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुआल, सिद्धार्थ निगम, विजेंदर सिंग, विनाली भटनागर, जस्सी गिल आणि व्यंकटेश यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT