Salman Khan Issues Statement For fake casting calls : अभिनेता सलमान खानने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. तो आणि त्याची निर्मिती सलमान खान फिल्म्स चित्रपटांमध्ये कास्ट करण्यासाठी कोणत्याही थिर्ड पार्टीशी संबंधित नाही.
फेक कास्टिंग कॉल करून त्याची आणि त्यांच्या कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आहे. तसेच त्याचे नाव किंवा त्याच्या कंपनीचे नाव वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेल म्हटले आहे.
सोमवारी इन्स्टाग्रामवर सलमानने एक पोस्ट शेअर करत निवेदनात दिले आहे. त्या निवेदनात त्याने म्हटले आहे की, “सलमान खान किंवा सलमान खान फिल्म्स सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग करत नाही. (Latest Entertainment News)
आम्ही आमच्या भविष्यातील कोणत्याही चित्रपटासाठी कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती केलेली नाही. कृपया या उद्देशासाठी तुम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही ईमेल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही थिएड पार्टीने सलमान खान किंवा एसकेएफचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.”
सलमान खानने 2011 मध्ये सलमान खान फिल्म्स या चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनीची स्थापना केली. त्याची आई सलमा खान देखील त्याचा एक भाग आहे. चित्रपट निर्मितीतून मिळणारा पैसा बिंग ह्युमन संस्थेला दान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. नितेश तिवारी आणि विकास बहल दिग्दर्शित चिल्लर पार्टी या बॅनरखाली निर्माण झालेला पहिला चित्रपट होता.
सलमान खान फिल्म्सने बजरंगी भाईजान, हिरो, ट्यूबलाइट, रेस 3, लवयात्री, नोटबुक, भारत, कागज, दबंग 3, राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई आणि अंतीम: द फायनल ट्रुथ यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या कंपनीनीने सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट शेवटचा निर्मित केला आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित, या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, भूमिका चावला, राघव जुयाल, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल आणि तनिकेला भरणी (Celebrity) यांनी भूमिका केल्या होत्या.
यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. बॉक्स ऑफिसवर त्याची सुरुवात चांगली झाली. तर काही दिवसात चित्रपट बॉक्स ऑफिसवरून गायब झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.