Salman Khan Hosting Bigg Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: आम्ही चोर वाटतो का? संतापलेल्या सलमानकडून शालीन-अर्चनाची खरडपट्टी

अर्चना गौतम आणि शालीन भानोत सलमानच्या रागाच्या बळी ठरणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 16 Latest Update: हिंदी 'बिग बॉस 16'मध्ये रोजच नवीन काहीतरी पाहायला मिळत आहे. वीकेंडला सलमान खान स्पर्धकांची कान उघडणी करताना दिसतो. 'वीकेंड का वार' या दर आठवड्याला होणाऱ्या विशेष भागामध्ये सलमान खान स्पर्धकांना फाटकारताना तसेच घरामध्ये काय करावे आणि काय करू नये हे सांगताना दिसतो. शुक्रवारच्या 'वीकेंड का वार'च्या भागात सलमान खान पुन्हा एकदा स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. यावेळी अर्चना गौतम आणि शालीन भानोत सलमानच्या रागाच्या बळी ठरणार आहेत.

'बिग बॉस 16'च्या या आठवड्याच्या वीकेंड का वार एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान पहिल्यांदा अर्चना गौतममची शाळा घेताना दिसत आहे. सलमान रागाने अर्चनाला म्हणतो, 'आम्हाला माहित नाही तू अशा कोणात्या लोकांसोबत राहतेस , तुझे कपडे कोण चोरतं. आम्ही त्या लोकांपैकी नाही, अर्चना. अर्चनाने तिच्या चार बॅगा घरामध्ये आल्या नसल्याचा आरोप केला होता. ती सांगत आहे की, 'माझ्या चार बॅगा होत्या, माझ्या चारही बॅगा गायब झाल्या आहेत वॅनिटीमधून. मग ती चोरी कोणी केली.. आता बघा, मी तुमच्या शोची वाट लावते.' (Bigg Boss)

यानंतर सलमान खान शालीन भानोतला चिकनच्या मुद्द्यावरून त्याला खडे बोल सुनावतो. सलमान म्हणतो, 'शालीन तू खूपच चिकन चिकन करत असतोस. काम सुरू करण्यापूर्वी, रात्री झोपण्यापूर्वी, सर्व वेळ तू फक्त चिकन चिकन करतोस.' तसेच सलमान खान बिग बॉसला म्हणतो, 'तुम्ही हे सर्व का पाठवता? मी म्हणतो तुम्ही हे सर्व पाठवणे थांबवा.' सलमान शालीनला समजावताना म्हणतो, 'तुझे लक्ष ट्रॉफीवर असले पाहिजे, चिकनवर नाही. हे खूप कंटाळवाणे आहे, यात काही मजा नाही. (TV)

'बिग बॉस 16'च्या स्पर्धकांना सलमान खानचे बोलणे नक्कीच समजले असेल. एखादी गोष्ट रेटून काही होत नाही. 'बिग बिसच्या घरात चांगले वागून, आपले म्हणणे स्पष्टपणे मांडून आणि प्रेक्षकांच्या मनात घर करूनच टिकून राहता येते. या आवठवाड्यात तर अर्चना आणि शालीनला चांगलं उत्तर मिळाले आहे. येणाऱ्या भागात हे दोघे कसे वागणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Salman Khan)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT