Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Ex Girlfriend Post: सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोई खास मेसेज, काय म्हणाली? वाचा

Salman Khan Ex Girlfriend Post To Lawernce Bishnoi: सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने लॉरेन्स बिश्नोईसंदर्भात पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या जिवाला धोका आहे. सलमान खान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला जिवे मारण्याची धमकी आली आहे. अशातच आता सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने लॉरेन्स बिश्नोईसंदर्भात पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट लिहली आहे. ती लॉरेन्सला आपला भाऊ मानते. तिने त्याला पोस्टद्वारे संवाद साधण्याबाबत थेट संदेश केला आहे. सोमी अलीने तिच्या सोशल मिडिया अधिकृत अकाऊंटवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो पोस्ट केला आहे.

काय आहे सोमी अलीची पोस्ट

सोमी अलीने लॉरेन्स बिश्नोईचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, "नमस्कार लॉरेन्स भाऊ, तुरूंगातूनही तुम्ही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकले आणि पाहिले आहे. त्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कृपया करून तुम्ही मला सांगा की मी संपर्क कसा करू शकते?

पुढे सोमीने, संपूर्ण जगात आमचे आवडते ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला देखील तुमच्या मंदिरात पूजा करण्यासाठी यायचे आहे. मात्र त्याआधी आपण झूम कॉलवर बोललो पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवा हे तुमच्या फायद्याचे आहे. प्लिज मला तुमचा मोबाईल नंबर द्या तुमचे आमच्यावर खूप मोठे उपकार होतील धन्यवाद."

काय आहे नेमकं प्रकरण

सलमान खान सध्या चर्चेत आहे. सलमान खानच्या जिवाला धोका असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानची अत्यंत जवळची व्यक्ती बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने स्विकारली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आता सलमान खानला देखील निशाणावर धरले जात आहे. अलिकडेच सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT