Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan On His Wedding : तु माझ्याशी लग्न करशील का? सलमान खानच्या उत्तराने लाखों तरुणींचे हृदय तुटले...

Salman Khan at IIFA Press Conference: सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

Pooja Dange

Salman Khan Broke Her fans Heart: सलमान खान नुकताच आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. हा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे पार पडला. दरम्यान सलमान खान आणि विकी कौशल यांच्यातील भेटीचे विविध तर्कवितर्क लावण्यात आले. आता सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

सलमानच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पत्रकार महिलेने सलमानला 'माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले. यावर सलमान खान खूप गंभीर उत्तर दिले. सलमान खान त्या पत्रकार महिलेला म्हणाला, 'माझं लग्न करायचं वय आता निघून गेलं आहे. वीस वर्षपूर्वी विचारलं असत तर...' (Latest Entertainment News)

आयफा २०२३ मध्ये गेलेल्या ५७ वर्षीय सलमान खानला लग्नाचा प्रस्ताव आला आहे. भाईजानला हा प्रस्ताव भारतातून नव्हे तर एका परदेशी रिपोर्टरने दिला आहे. त्याचवेळीसलमान खानने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्सच्या (आयफा) सोहळ्यासाठी सलमान खान सध्या अबुधाबीमध्ये आहे. तेथील त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पापाराझीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक हॉलिवूड रिपोर्टर सलमान खानला लग्नाचा प्रस्ताव देताना दिसत आहे.

संभाषणादरम्यान मीडिया रिपोर्टर सलमान खानला सांगतो की, ती हॉलिवूडहून आली आहे. ज्या क्षणी तिने सलमानला पाहिले त्या क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली, फक्त हे सांगण्यासाठी ती आली असल्याचे तिने सांगितले. सलमान खान यावर उत्तर देत गंमतीने म्हटले, "तू शाहरुख खानबद्दल बोलतोयस ना?" "तू माझ्याशी लग्न करशील का?"

सलमान खानचे लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या डेटींगच्या बातम्या खूप आल्या असल्या तरी आजतागायत त्यांनी लग्नगाठ बांधली गेली नाही. त्याचबरोबर त्याला अनेक रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये लग्नाचे प्रस्ताव आले आहेत.

सलमान खानच्या टायगर 3 चे शूटिंग पूर्ण झाले आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भाईजान बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन होस्ट करताना दिसणार आहे, ज्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT