Salman - Aishwarya Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Salman - Aishwarya Viral Video: सलमान, ऐश्वर्या आणि आराध्याचा 'तो' व्हिडीओ का होतोय व्हायरल?.. जाणून घ्या प्रकरण

अलीकडेच मुंबईत मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक बॉलिवूड सिनेतारकांनी हजेरी लावली होती.

Chetan Bodke

Salman - Aishwarya Viral Video: अलीकडेच मुंबईत मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक बॉलिवूड सिनेतारकांनी हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमाला केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

यावेळी मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, सलमान खान, शाहरुख खान अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सोहळ्यातील सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे, जो पाहून काही चाहते आश्चर्यचकित झाले आहेत तर काही चाहते खुश आहेत.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी एकत्र पाहण्याची इच्छा पुन्हा एकदा चाहत्यांना झाली आहे. वास्तविक या व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एकत्र पोज देत आहेत आणि आराध्या बच्चन सुद्धा मध्ये दिसत आहे. 20 वर्षांनंतर एकत्र दिसलेल्या दोघांच्या या व्हिडिओचे संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

सलमान आणि ऐश्वर्याच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये ‘मैने प्यार किया’ चित्रपटाचे गाणे असून तिघेही पापाराझींना पोज देत फोटो काढत आहेत. अनेक कॅमेरामन्स त्यांना आवाज देत फोटो काढण्यासाठी आवाज देत आहेत. याआधी, सलमान खान, आराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या व्हिडिओवर अनेक युजर कमेंट करत म्हणतात, दोघेही एकत्र चांगले दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काहींनी सलमानला लग्नावरुन ट्रोल देखील केले आहे, नेटकरी म्हणतात, भाईजानची बायको आणि आराध्याचे कपाळ या जन्मात दिसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने एडिट करुन वेगवेगळे व्हिडीओ एडिट करत एकत्र केले आहेत. ही व्हिडीओ सर्वांनाच खरे वाटत आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बॉलिवूडच्या सुंदर रोमँटिक कपल्सपैकी एक मानली जातते. जवळपास एकमेकांना २ वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2002 मध्ये ब्रेकअप झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT