Aishwarya Rai-Salman Khan Breakup SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

Prahlad Kakkar Talk On Salman Khan Aishwarya Rai Breakup : दिग्दर्शक प्रहलाद कक्कड यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमक काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे रिलेशनशिप सुरू झाले.

ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा 2002 मध्ये ब्रेकअप झाला.

दिग्दर्शक प्रहलाद कक्कड यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) यांचे नाते कायम चर्चेचा विषय असतो. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. सलमान खान ऐश्वर्या राय अनेक काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर कालांतराने तिचा ब्रेकअप झाला. त्यांच्या नात्याबद्दल अनेक मोठे खुलासे होत राहतात.

आता विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक प्रहलाद कक्कड (prahlad kakkar) यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ऐश्वर्या रायसाठी ब्रेकअप चांगली गोष्ट ठरली. मी तिला पाठिंबा दिला होता. सलमान खान तिच्यावर हात उचलायचा तिला मारायचा. सलमान ऐश्वर्यासाठी वेडा होता. मी सेम बिल्डिंगमध्ये राहायचो. सलमान बिल्डिंगमध्ये खूप तमाशा करायचा. आरडाओरडा करायचा. भिंतीवर डोकं आपटायचा. तिने खूप आधीच त्यांच्यासोबत ब्रेकअप केले होते. सलमानसोबतच्या रिलेशनशिपमुळे ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबियांना खूप त्रास झाला.

प्रहलाद कक्कड पुढे म्हणाले की, "ऐश्वर्याला ब्रेकअपबद्दल दुःख नव्हते. परंतु त्या वेळी संपूर्ण इंडस्ट्रीने सलमान खानची बाजू घेतली. तिची नाही त्यामुळे तिला जास्त दुःख झाले होते. कोणीही तिची बाजू ऐकली नाही. तिच्यावर अन्याय झाला होता म्हणून तिचा इंडस्ट्रीवरील विश्वास उडाला."

'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे रिलेशनशिप सुरू झाले. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला. 2002 मध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा ब्रेकअप झाला. त्यानंतर 2007मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. सलमान खान आणि ऐश्वर्या राय आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर ऐश्वर्या राय आजही आपल्या दमदार अभिनयाने आणि लूकने चाहत्यांना घायाळ करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT