Famous Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला ६० व्या वर्षी व्हायचे 'बाबा'; खुलासा करत म्हणाला - "मला मुलांची..."

Bollywood Actor : बॉलिवूडच्या सुपरस्टारने वयाच्या ६० व्या वर्षी बाप होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेता कार्यक्रमात नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली 'बाप' होण्याची इच्छा

६० व्या वर्षी अभिनेत्याला वडील व्हायचे

अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक केले मोठे खुलासे

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'बिग बॉस २०' मुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात सलमान खान करण जौहरच्या 'कॉफी विथ करण 9' मध्ये दिसणार आहे. सलमान शोचा पहिला पाहुणा असणार आहे. याचा खास प्रोमो देखील रिलीज झाला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमान खानने या शोमध्ये वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. तसेच 'बाबा' होण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली आहे.

सलमान खानने स्पष्ट केले की, स्वतःची मुले असण्याचा अनुभव त्याने गमावला आहे. VarietyIndia च्या रिपोर्टनुसार, 'कॉफी विथ करण 9' मध्ये करण जौहर सलमान खानला विचारतो की, त्याला स्वतःचे मूल नसल्याची खंत किंवा कमतरता भासते का? यावर उत्तर देत सलमान खान म्हणाला," हो! मला नक्कीच कधीतरी माझं मूल हवं आहे..." मात्र अद्याप सलमान खानच्या संभाषणाचा तपशील पूर्णपणे समोर आलेला नाही. सलमान खानने याआधीही बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

वयाच्या ६० व्या वर्षी सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष वेधत आहे. 'कॉफी विथ करण 9' चा पहिला भाग खूपच खास ठरणार आहे. सलमान खानसोबतच या भागात बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर देखील पाहायला मिळेल. त्यामुळे गप्पा चांगल्या रंगतील आणि अनेक सीक्रेट्स बाहेर येतील. या सीझनसाठी चाहते खूपच उत्सुक आहे. हा 'कॉफी विथ करण' चा शेवटचा सीझन असल्याचे बोले जात आहे. 'कॉफी विथ करण' सीझन ९ जिओहॉटस्टार आणि 'द पीकॉक हब' वर पाहायला मिळणार आहे.

सलमान खानचे आगामी चित्रपट

सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खान सध्या तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी, जाणून घ्या

Knee Damage : गुडघे कमजोर करत आहेत रोजच्या 'या' ५ सवयी; वेळीच ओळखा धोका, नाहीतर...

7 Types Of Veg Rice: रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा सोप्या आणि चवदार 7 व्हेज राईस रेसिपीज

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Restaurant Price Hike : खवय्यांच्या खिशाला बसणार फटका! हॉटेल - रेस्टॉरंटमधील जेवण महागणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

SCROLL FOR NEXT