Salaar Movie Teaser  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Teaser Record : सालारचा नवीन विक्रम ; काही तासातच टीजरने पार केले शेकडो मिलियन व्ह्यूज

Salaar Movie Teaser : चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salaar Movie Teaser Crossed 100 Million Views : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

प्रशांत नील निर्मित सालार चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटात प्रभास आणि श्रृती हसन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ६ जुलैला चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही तासातच चित्रपटाच्या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले होते. टीजरने १०० मिलियनचा व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. सालारच्या टीजरने नवीन इतिहास रचला आहे. आतापर्यंत एवढ्या कमी वेळात एवढे व्ह्यूज मिळवणारा हा एकमेव चित्रपट आहे.(Latest Entertainment News In Marathi)

होंबले फिल्मस या निर्मिती संस्थेने सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 'भारतीय चित्रपटसृष्टीत सालार हा एक अविभाज्य भाग आहे. तुमच्याकडून आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल आम्ही आभारी आहोत. चित्रपट 'सालार'च्या टीझरला १०० मिलियन व्ह्यूजच्यासाठी आम्ही आभारी आहोत. तूमचे हे प्रेम,पांठिबा आम्हाला प्रेरित करतो.ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तयार राहा. आम्ही लवकरच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार आहोत. एका अविस्मरणीय अनुभवासाठी सज्ज व्हा.एक मोठा धमाका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबाबतची सर्व माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू'. अशी पोस्ट शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

'सालार' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'केजीएफ'नंतर प्रशांत नील यांच्या अॅक्शन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. टीजरवरुनच चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी शक्यता वर्तवली जाते. या चित्रपटात प्रभास,श्रृती हसन, पृथ्वीराज अशी कास्ट दिसणार आहे. प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर,प्रभासचा 'प्रोजेक्ट के' हा बिग बजेट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT