Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : अजय, सिद्धांत की अहान; वीकेंडला तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Saiyaara vs Son Of Sardaar 2-Dhadak 2 Collection : बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळत आहे. 'सैयारा', 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' बॉक्स ऑफिसवर एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.

Shreya Maskar

बॉक्स ऑफिसवर 'सैयारा', 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' चित्रपट पाहायला मिळत आहे.

'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' चित्रपट 1 ऑगस्टला रिलीज झाले आहेत.

'सैयारा' चित्रपट 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट धुमाकूळ घालत आहे. यात 'सैयारा', 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' यांचा समावेश आहे. 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' दोन्ही चित्रपट 1 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर 'सैयारा' (Saiyaara) 18 जुलैला रिलीज झाला आहे. वीकेंडला कोणता चित्रपटाचा शो हाऊसफुल पाहायला मिळाला जाणून घेऊयात. तिन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाचा.

'सन ऑफ सरदार 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

  • पहिला दिवस - 7.25 कोटी

  • दुसरा दिवस - 8.25 कोटी

  • तिसरा दिवस- 9.25 कोटी

  • एकूण - 24.75 कोटी

'धडक 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

  • पहिला दिवस - 3.35 कोटी

  • दुसरा दिवस - 3.75 कोटी

  • तिसरा दिवस- 4.25 कोटी

  • एकूण -11.50 कोटी

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सैयारा'च्या कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा'ने वीकेंडला (रविवारी) 8 कोटींची कमाई केली आहे. 17 दिवसांत 'सैयारा' चित्रपटानं 299.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'सैयारा' चित्रपट

'सैयारा' या प्रेम कथेने जगाला वेड लावले आहे. अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे.

'सन ऑफ सरदार 2' चित्रपट

'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगण (Ajay Devgn), मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्या कॉमेडीने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत. 'सन ऑफ सरदार 2'हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे. चित्रपटात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे.

'धडक 2' चित्रपट

'धडक 2' हा रोमँटिक ड्रामा आहे. सिद्धांत चतुर्वेदीचा (Siddhant Chaturvedi) आणि तृप्ती डिमरीच्या (Tripti Dimri) केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 'धडक 2' चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इकबाल हिने केले आहे. 'धडक 2' हा चित्रपट 2018 साली रिलीज झालेल्या 'धडक'चा सीक्वल आहे.

'सन ऑफ सरदार 2' कधी रिलीज झाला?

1 ऑगस्ट

'सैयारा' कधी रिलीज झाला?

18 जुलै

'धडक 2'चे कलेक्शन किती?

11.50 कोटी

'सन ऑफ सरदार 2'नं बॉक्स ऑफिसवर किती कमावले?

24.75 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : परभणीत समृद्धी महामार्गाच्या मूल्यांकनावरून जोरदार खडाजंगी

Rahul Gandhi : एक सच्चा भारतीय असं बोलू शकत नाही; भारतीय लष्करावरील टिप्पणीवरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारलं

१५४ जणांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; ६८ जणांचा मृत्यू, ७४ जण बेपत्ता

Tandalachi Bhakri: मऊ, लुसलुशीत तांदळाची भाकर बनवण्यासाठी सोपी ट्रिक

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर एका महिन्यात किती टोल वसुली? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे १ नंबर

SCROLL FOR NEXT