Saiyaara yandex
मनोरंजन बातम्या

मराठमोळा ठसका! Saiyaara च्या मराठी Versionची तरूणाईमध्ये क्रेझ, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Saiyaara Marathi Version : 'सैयारा' चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर आजही तुफान गाजतात. 'सैयारा' या हिंदी गाण्याचे मराठी Version सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

'सैयारा' चित्रपट 18 जुलैला रिलीज झाला.

'सैयारा' या हिंदी गाण्याचे मराठी Version सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'सैयारा'मध्ये अनीत पड्डा आणि अहान पांडे मुख्य भूमिकेत आहेत.

2025 सुपरहिट रोमँटिक चित्रपट 'सैयारा' (Saiyaara) 18 जुलैला रिलीज झाला आहे. आजही सर्वत्र 'सैयारा'च्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'सैयारा' जोडी अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अहान पांडेच्या (Ahaan Panday) अभिनयाने तर चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना सिनेमासोबत बांधून ठेवले आहे. 'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे.

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या कला सादर करताना दिसतात. कंटेंट क्रिएशन आज अनेकजण करताना दिसत आहे. कंटेंट क्रिएशन लोकांना प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडियावर दोन मित्रांची एक जोडी आहे. यश आणि अनिकेत ही दोघे कायम गाजलेल्या किंवा त्यांना आवडेल्या हिंदी गाण्यांचे मराठी व्हर्जन गाताना दिसतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. चाहते त्यांच्या गाण्यांना खूप पसंती देतात.

2025 मध्ये आलेला 'सैयारा' चित्रपट खूप गाजला. 'सैयारा'ची कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. चित्रपटाची गाणी आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. यश आणि अनिकेतने 'सैयारा'चे मराठी व्हर्जन गायले आहे. जे इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. darkstaryash यांच्या अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. या गाण्याचे बोल असे की, "तु हविशी वाटे मनाला, श्वास जसा लाजमी या जीवाला,नाते प्रीतीच्या बंधातले हे, का कळेना काही कुणाला..." या दोघांचा आवाजही खूप मधुर आहे.

थिएटर गाजवल्यानंतर 'सैयारा' रोमँटिक ड्रामा ओटीटीवर रिलीज झाला. 'सैयारा' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतो. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाने 550 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. 'सैयारा' कपल सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT