Saiyaara Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'नं लावलं वेड; अहान पांडेच्या पहिल्याच चित्रपटाची हवा, सलमान-अक्षयला दिली टक्कर

Saiyaara Box Office Collection Day 5 : 'सैयारा' चित्रपटाची दिवसेंदिवस क्रेझ वाढताना दिसत आहे. अहान पांडेने बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमारला मागे टाकले आहे.

Shreya Maskar

मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'सैयारा' चा क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 'सैयारा' चित्रपट 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अहान पांडे (Ahaan Panday) मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

'सैयारा' ही एक प्रेमकथा आहे. 'सैयारा' चित्रपटातील अहान आणि अनीतच्या केमिस्ट्रीची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे. चित्रपटाने आपले बजेट देखील वसूल केले आहे. 'सैयारा' ही एक प्रेम कथा असून संघर्ष करणाऱ्या संगीतकाराची गोष्टी देखील यात सांगितली गेली आहे. चित्रपटातील गाणी संपूर्ण सिनेमाला बांधून ठेवतात. 'सैयारा' चित्रपटाने पाच दिवसांत किती कोटीचा व्यवसाय (Saiyaara Box Office Collection Day 5) केला जाणून घेऊयात.

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

  • पहिला दिवस - 21 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 26 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 37.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 25 कोटी रुपये

  • एकूण - 132.25 कोटी रुपये

'सैयारा'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'सैयारा' नं 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. 'सैयारा' चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' (112 कोटी रुपये) आणि सलमान खानच्या 'सिकंदर' (110 कोटी रुपये) या चित्रपटांना मागे टाकले आहे.

टॉप 5 चित्रपट

  • छावा - 601 कोटी रुपये

  • हाउसफुल 5 - 183 कोटी रुपये

  • रेड 2 - 173 कोटी रुपये

  • सितारे जमीन पर - 163 कोटी रुपये

  • सैयारा - 132.25 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT