Rinku Rajguru Instagram Saam Tv
मनोरंजन बातम्या

सैराटची 'आर्ची' येतेय नवीन अवतारात, चित्रपटाचा ट्रेलर पाहा!

रिंकू राजगुरू आता पुन्हा एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. या नवीन चित्रपटाचा ट्रेलर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिग्दर्शक (director) नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' (sairat) या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत राहिली आहे. सैराटनंतर(actress) अभिनेत्री रिंकू राजगुरूने अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये तिने काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'झुंड' चित्रपटामधील तिच्या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरू आता पुन्हा एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. या नवीन चित्रपटाचा ट्रेलर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाशी संबंधित पोस्ट रिंकू राजगुरू तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते. तिने या चित्रपटासंदर्भात अनेक पोस्ट तसेच टीजर, ट्रेलर आणि रील्स शेअर केले आहेत.

'आठवा रंग प्रेमाचा' हा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. खुशबू सिन्हाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे .आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.

'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटात आजच्या काळातली कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपटाच्या नावातच प्रेमाचे आठ रंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. टीजर आणि ट्रेलरनुसार हा चित्रपट ॲसिड हल्ल्याच्या घटनेशी संबंधित असल्याचे दिसते. हा गंभीर विषय 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत मांडण्यात येणार आहे. यापूर्वी दीपिका पदुकोणचा छपाक हा चित्रपट ॲसिड हल्ल्याच्या विषयावर आधारित होता.

Edited By - Shruti Kadam

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT