Saif Ali Khan Net Worth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Net Worth : पतौडी पॅलेस, कोट्यवधींचं घर, महागड्या गाड्या..; बॉलिवूडचा नवाब किती कोटींचा मालक?

Nawab Saif Ali Khan : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्या अभिनयाने भूमिकेत जीव ओततो. सैफ अली खान खूप लग्झरी आयुष्य जगतो. त्याची एकूण संपत्ती किती? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड स्टार सैफ अली खान ( Saif Ali Khan ) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या दमदार अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याची इंडस्ट्रीमध्ये नवाब म्हणून ओळखले जाते. 90 व्या दशकापासून आतापर्यंत सैफ अली खानने शानदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

सैफ अली खान नवाबांच्या घराण्यातून आहे. त्यांने 'परंपरा' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सैफने आपल्या आजवरच्या संपूर्ण कारकि‍र्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या अभिनयाचे चाहते वेडे आहेत. त्यांनी मैं खिलाडी तू अनारी, कल हो ना हो, हम साथ साथ हैं, कच्चे धागे, सलाम नमस्ते, रेसअशा अनेक हिट चित्रपट काम केले आहे. त्यांच्या तान्हाजी चित्रपटातील भूमिकेने तर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 1200 कोटी रुपये सैफ अली खानची एकूण संपत्ती (Net Worth) आहे. तर सैफची वार्षिक कमाई ३० कोटींहून अधिक आहे. सैफ अली खान चित्रपट, जाहिराती, वेब सिरीज, ब्रँड यांच्यातील पैसा कमावतो. तसेच सैफ अली खानने अनेक वैयक्तिक गुंतवणूक देखील केल्या आहेत.

सैफच्या नावावर इलुमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाइट फिल्म्स असे दोन प्रॉडक्शन हाऊस आहेत. सैफकडे हरियाणातील पतौडी पॅलेस, मुंबईतील आलिशान बंगला मिळून करोडोची मालमत्ता आहे. सैफ अली खानकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तसेच तो आपल्या मुंबई वांद्रे येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत राहतो. त्याचा या आलिशान गाड्यांची किंमत लाख आणि करोडात आहे. त्याच्याकडे Audi R8 Spyder, BMW 730LD तसेच अजून अनेक गाड्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT