Saif Ali Khan Angry Saam Tv
मनोरंजन बातम्या

'माझ्या बेडरूममध्ये पण घुसा...' असं काय झालं की Saif Ali Khan कॅमेरामन्सवर भडकला

करीना कपूर आणि सैफ अली खान नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Chetan Bodke

Saif Ali Khan: बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नेहमीच पापाराझींच्या चर्चेत नेहमीच असतात. त्यातीलच बॉलिवूडमधील एक जोडी म्हणजे, करीना कपूर आणि सैफ अली खान. करीना कपूर आणि सैफ अली खान नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

मलायका अरोराची आई जॉयस अरोरा यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी करीना आणि सैफ जात असताना पापाराझींनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा सैफ सर्व पापाराझींवर कमालीचा संतापला.

पार्टीनंतर, हे जोडपे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जात असताना पापाराझींनी त्यांना फोटोसाठी पोज देण्यास सांगून त्यांचा पाठलाग सुरू केला. सैफ अली खान, करीना कपूरसोबत घरी येणाऱ्या पापाराझींना सैफ म्हणतो," एक काम करा, तुम्ही माझ्यासोबतच बेडरुममध्ये चला" पापाराझी नेहमीच सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात.

गेल्या काही दिवसांपुर्वी एका पापाराझीने आलियाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. लगेचच आलियाने त्या पापाराझीच्या विरोधात पोलिस स्थानकात धाव घेतली होती. आलिया भट्ट सोबतच, अनुष्का शर्मा, सुष्मिता सेन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोहर आणि चित्रपट दिग्गज झीनत अमान यांच्यासह अनेक कलाकारांनी पापाराझींबद्दल आक्रमक पाऊलं उचलले आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना तैमुर आणि जेह असे दोन मुलं आहेत, आई- वडिलांप्रमाणेच त्या दोन लेकरांची ही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असते.

करीना कपूर शेवट आमिर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा'मध्ये दिसली होती. लवकरच करीना विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्या सहकलाकार असलेल्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स'मध्ये दिसणार आहे.

अभिनेत्रीने रिया कपूरसोबत द क्रू नावाचा एक चित्रपट देखील साइन केला आहे, ज्यामध्ये ती तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत सहकलाकार करणार आहे. ही अभिनेत्री हंसल मेहताच्या अनटायटल प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे.

सैफ अली खान शेवटचा विक्रम वेधा या चित्रपटात हृतिक रोशनसोबत दिसला होता. अभिनेत्याचा पुढचा प्रोजेक्ट ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

Cabinet Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या 3 मेगा प्रकल्पांना ग्रीन सिग्नल; राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचा होणार विस्तार?

T20 World Cup : गौतम गंभीरच्या पॉलिटिक्सनं टीम इंडियाला बर्बाद केलं; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं नाक खुपसलं

जावई भडकला, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; सोलापुरात खळबळ

Peacock Design Mangalsutra: साडी किंवा ड्रेसवर दिसाल उठून; ट्राय करा या ७ ट्रेंडी लेटेस्ट पिकोक मंगळसूत्र डिझाईन्स

SCROLL FOR NEXT