Saif Ali Khan Attack Update : अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सैफ डिस्चार्ज होणार आहे असेही म्हटले जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर सैफ अली खानचा विमा फॉर्म व्हायरल झाला आहे.
एक्सवर व्हायरल झालेल्या विमा रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सैफ अली खानच्या वैद्यकीय उपचारांसाठी ३५.९५ लाख रुपयांचा दावा दाखल केला आहे. एकूण रकमेपैकी २५ लाख रुपये विमा मंजूर केला गेला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये विम्याच्या रकमेसोबतच सैफचा लिलावती रुग्णालयातील आयडी, खोलीचा प्रकार अशी संवेदनशील माहिती पाहायला मिळते. रिपोर्टनुसार, सैफला मंगळवारी (२१ जानेवारी) डिस्चार्ज मिळणार आहे असे म्हटले आहे.
सैफ अली खानची विमा कंपनी, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने व्हायरल होणााऱ्या विमा रिपोर्टची पृष्टी केली आहे. 'सैफला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आम्हाला पैसे पाठवण्यासाठी संपर्क करण्यात आला होता. तेव्हा आम्ही उपचार सुरु करण्यासाठी प्रारंक्षिक रकमेला मंजूरी दिली', असे इन्शुरन्स कंपनीने स्पष्टीकरण दिले. कॅशलेस उपचारांसाठी २५ लाख रुपये ही प्रारंभिक रक्कम आहे. डिस्चार्ज देताना उरलेली रक्कम पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार दिली जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. तो वांद्रे स्थानकाजवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्याच्या फास्ट्रॅक बॅगेवरून त्याची ओळख पटली. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पाच तास वांद्रे परिसरात होता. त्याने एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.