Sai Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: "७ महिने मी एकटी, भितीही वाटली..." सईने सांगितला तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग

Sai Tamhankar News: सई प्रोफेशनल लाईफसह तिच्या वैयक्तिक लाईफमुळे कायमच लक्ष वेधते. सई लवकरच एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच चर्चेत असते. सईने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत नाव केलं आहे. सईने तिच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सई प्रोफेशनल लाईफसह तिच्या वैयक्तिक लाईफमुळे कायमच लक्ष वेधते. सई लवकरच एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचनिमित्ताने सईने मुलाखत दिली. यामध्ये सईने तिच्या आयुष्यातील कठिण प्रसंगाना उजाळा दिला आहे.

सई ताम्हणकर लवकरच 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचनिमित्ताने सईने सकाळ प्रीमियर चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी सईने तिच्या भितीदायक अनुभव सांगितला आहे. सईने एंग्जायटीचा सामना केल्याचा सांगितलं आहे.

सई म्हणाली, मी डिप्रेशन नाही पण एजांयटीचा मोठा त्रास सहन केला आहे. कोविडदरम्यान मला एंग्जायटीचा अॅटॅक आला होता. एंग्जायटी हा खूप भितीदायक प्रसंग होता. यावेळी मी खूप घाबरले होते.मला श्वास घ्यायला त्रास होत होता. याचदरम्यान कोविडचे दिवस असल्याने सात महिने मी एकटी होते.

एंग्जायटीचा अॅटॅक आल्यानंतर शरीरामध्ये नेमकं काय सुरू आहे. हे देखील आपल्याला कळत नाही. आपण कोणाला याविषयी सांगू देखील शकत नाही. तसेच पुढे तिने डिप्रेशनमध्ये व्यक्तीला काय त्रास होतो हे सांगता येत नाही. ज्याप्रमाणे एका जोडप्याचा नात्याचा शेवट होतो. तेव्हा ते काही व्यक्त होऊ शकत नाही

आगामी काळात सई 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिदजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सईसोबत आशुतोष गोवारीकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे हे कलाकार मुख्यभूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT