Sai Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar In Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सई ताम्हणकर लावणार हजेरी, अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांनी अभिनेत्रीची बोलती बंद

Sai Tamhankar : सई ताम्हाणकरच्या जीवनातील रहस्य अवधूत गुप्ते उलघडणार.

Pooja Dange

Sai Tamhankar Will Seen In Khupte Tithe Gupte :

झी मराठी वाहिनीवरील अवधूत गुप्तेचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो नेहमीच चर्चेत असतो. जूनच्या सुरुवातीला खुपते तिथे गुप्तेचे नवे पर्व सुरू झाले. या नव्या पर्वाची सुरुवात राजकारण्यांनी झाली. अनेक राजकीय नेत्यांनी खुपते तिथे गुप्तेमध्ये हजेरी लावली आहे.

दरम्यान झी मराठीवर या शोचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला खुपते तिथे गुप्तेच्या येणाऱ्या भागात कोणती सेलिब्रिटी दिसणार आहे याची झलक दाखवली आहे.

खुपते तिथे गुप्ते रविवारच्या भागात म्हणजे ३० जुलैला अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या भेटीला येणार आहे. या व्हिडीओमध्ये अवधूत सईच्या सनई चौघडे या चित्रपटातील गाणे गाऊन तिला आमंत्रित करताना दिसत आहे.

त्यानंतर अवधूत, सई ताम्हाणकरच्या जीवनातील एक एक रहस्य उलघडयाला सुरुवात करतो. अवधूतचे प्रश्न ऐकून सई देखील चकित होते आणि अवधूतला विचारते, 'तुमची सूत्र कोण आहेत ज्यांनी तुम्हाला इतकी अचूक माहिती दिली आहे.'

सईने यावेळी जांभळ्या रंगाचा बॉडीकॉन सूट घातल्याचे दिसत आहे. तर मोकळे केसांना वेव्ह दिले आहेत. सई नुकतीच तिचा बॉयफ्रेंड अनिश जोगचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्पेनला गेली होती.

खुपते तिथे गुप्तेचा प्रोमो पाहून हा भाग खूप इंटरेस्टिंग होणार हे लक्षात आहे. सईविषयी जाणून तिचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. या भागात प्रेक्षकांना चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी समजतील. तर राजकीय नेत्यानंतर अखेर अभिनेत्री येणार असल्याने प्रेक्षक खुश आहेत आणि कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे.

याआधी या शोमध्ये राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, श्रेयस तळपदे, नारायण राणे, संजय राऊत यांनी हजेरी लावली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT