Sai Tamhankar  Instagram @saietamhankar
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar Driver News : सई ताम्हणकरच्या ड्रायव्हारला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Beating Sai Tamhankar driver : सई ताम्हणकरच्याच ड्रायव्हरला भर रस्त्यात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sai Tamhankar News

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असते. परंतु आता सई तिच्या ड्रायव्हरमुळे चर्चेत आली आहे.

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या सहकलाकरांना किंवा इतर लोकांना मदत करताना दिसते. परंतु आता सई ताम्हणकरच्याच ड्रायव्हरला भर रस्त्यात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सई ताम्हणकरचा ड्रायव्हर सद्दाम मंडल (वय ३२) याला हॉर्न वाजवल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली आहे. मालवणीच्या अंबुजवाडी येथे हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मारहाण केलेल्या चौघांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

मालवणीच्या अंबुजवाडी परिसरात राहणारे सद्दाम मंडल ६ वर्षांपासून सईकडे वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. सईच्या शुटिंगच्या वेळेप्रमाणे त्यांच्या कामाच्याही वेळा सारख्या बदलत असतात. १३ ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुपारी १२ वाजता मोटार सायकलवरुन ते कामावर गेले. तेथून रात्री दहाच्या सुमारास परतताना हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

रात्री दहा वाजता सद्दाम दुचाकीने परतताना अंबुजवाडी परिसरात एक व्यक्ती मुद्दाम गाडी वाकडीतिकडी करुन पळवत होता. त्याच्या मागे अजून एक जण बसला होता. या गोष्टीचा सद्दाम यांना त्रास होत असल्याने त्यांनी हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्याने त्या व्यक्तीला राग आला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याच्या मागे असलेल्या मोटारसायकलवरील दोन जण मागून आले. त्या सर्वानी मिळून लाकडी बांबूने त्यांच्यावर हल्ला केला.

हे दृश्य पाहून मंडल यांचे मित्र इस्माईल खान आणि राजीव अन्सारी भांडण सोडवायला गेले. या हल्ल्यात ईस्माईल खानही जखमी झाले. हल्ला करण्यांपैकी एकाचे नाव मलिक असल्याचे समजलेय. त्यानंतर मंडल आणि खान कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी गेले. उपचारानंतर त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT