टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत.
अशामध्येच सारा तेंडुलकरचा एक डीपफेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सारा शुभमन गिलसोबत (shubman gill) दिसत होती. या फोटोवरून सारा तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. या डीपफेक फोटोवरून ती चांगलीच संतापली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सारा तेंडुलकरने डीपफेक फोटोवरून आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'माझे डीपफेक फोटो वास्तवापासून दूर आहेत. ट्विटरवर माझे अकाऊंट नाही. तरी देखील माझ्या नावाने कोणीतरी ट्विटरवर अकाऊंट उघडून त्याचा गैरवापर करत आहेत. तसंच लोकांची दिशाभूल करत आहेत.'
तसंच, 'सोशल मीडिया हे आपल्यासाठी सुख-दु:ख आणि दैनंदिन घडामोडी शेअर करण्यासाठीचे प्लॅटफॉर्म आहे. पण काही लोकांकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण ते इंटरनेटचे सत्य आणि सत्यता हिरावून घेत आहेत. मला आशा आहे की ट्विटरने अशा अकाऊंटकडे लक्ष देऊन त्यांचे अकाऊंट सस्पेंड करावे. मनोरंजन कधीही सत्याच्या किंमतीवर नसावे.', असं देखील तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ आणि रश्मिका मंदान्नाचा डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सारा तेंडुलकरचाही डीपफेक फोटो व्हायरल झाला. सारा आणि शुभमन गिल यांच्या रिलेशनशीपची बातमी त्यावेळी समोर आली होती. जेव्हा सारा अली खान 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या एपिसोडमध्ये म्हणाली होती की, 'संपूर्ण जग चुकीच्या साराच्या मागे लागले आहे.' यानंतर चाहत्यांना असा विश्वास बसू लागला की शुभमन गिल सारा तेंडुलकरला डेट करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.