Rupali Bhosale Saam TV
मनोरंजन बातम्या

Actress Rupali Bhosale: आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रियेचा अनुभव शेयर करताना झाली भावूक

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Marathi Actress Rupali Bhosale News: प्रसिद्ध मराठी मालिका आई कुठे काय करते या मालिकेचे अनेक चाहते आहेत. अरुंधती प्रमाणेच मालिकेतमधली खलनायिका संजना म्हणजेच रुपाली भोसलेनेही चाहत्यांच्या मनात स्वत:चं एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. अशात आता रुपालीच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रुग्णालयातला एक फोटो शेअर केला आहे. नुकतीच तिची एक शस्त्रक्रिया झाल्याचं तिनं सांगितलं आहे. (Latest Marathi News)

आभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रुग्णालयातील बेडवर बसलेली असून तिच्या हाताला सलाईन लावलेले दिसत आहे. नुकतीच तिची एक छोटी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती तिने दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली की, "आपण स्वत:ची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपण जेव्हा सुदृढ असतो तेव्हा आपण इतर व्यक्तींची देखील मदत करू शकतो. जसं निरोगी झाड चांगला फळं देतं तसंच आपलंही आहे."

अभिनेत्रीची (Actress) शस्त्रक्रिया झालेली असली तरी देखील तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य फोटोत कायम दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने पुढे याच हस्याविषयी म्हटले आहे की, " आयुष्यात अनेक अडचणी अचानक समोर उभ्या राहतात. मात्र आपण न घाबरता हसत हसत त्यांना सामोरे गेले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे."

अनेक व्यक्ती काही कारणाने आजारी असल्या की त्यावर लगेचच उपचार करत नाहीत. थोड्याश्या दुखण्याने काही होत नाही असं समजतात. त्यामुळे रुपलीने या विषयी लिहिलंय की, "काल माझी एक छोटी शस्त्रक्रिया पार पडली. मी आता ठीक आहे आणि आराम करत आहे. तुमच्या आशीर्वादांसाठी धन्यवाद. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की, आजारी पडल्यावर गोष्टी छोट्या असतानाच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त वेळ त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वत:ला गृहीत धरू नका."

दरम्यान, रुपालीने पोस्टमध्ये रुग्णालय आणि त्यातील कर्मचारी वर्गाचे देखील मनापासून आभार मानले आहेत. रुपालीच्या या पोस्टमुळे तिचे चाहते थोडे चिंतेत आहेत. अनेकांनी तिला कमेंट करत स्वत:ची काळजी घ्यायला सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळासाहेब एरंडे उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT