Raju Srivastava Health Update News In Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याच्या अफवा, मुलीनंच दिली नवी अपडेट

राजू श्रीवास्तव शुद्धीवर आला असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून बेशुद्धावस्थेत आहे. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) जीममध्ये ट्रेडमिलवर चालताना हृदयविकाराचा झटका आला होता. राजूला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचे चाहते त्याच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. राजूचा पर्सनल सेक्रेटरी गरवीत नारंग याने एक निवेदन जारी करून राजूच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे. परंतु, राजू श्रीवास्तव शुद्धीवर आला असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

माहितीनुसार, राजू श्रीवास्तवला शुद्ध आली असल्याचे वृत्त खोटे असून राजू श्रीवास्तवची मुलगी अंतरा हिने(Social Media) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. राजूच्या इन्स्टाग्राम हॅंडलच्या स्टोरीवर अंतराने एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात असे म्हटले की, 'माझे वडील राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. पण ते अजूनही व्हेंटिलेटरवरच आहेत. फक्त एम्स रुग्णालय आणि राजू श्रीवास्तव अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून येणाऱ्या अपडेटवरच विश्वास ठेवा अशी नम्र विनंती'.

याचबरोबर अंतराने पुढे लिहिले आहे की, 'एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही सर्व डॉक्टरांचे आणि सर्व शुभचिंतकांचे आभारी आहोत. माझी, माझ्या वडिलांच्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की त्यांच्यासाठी अशीच प्रार्थना कायम करत राहा'.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत त्याच्या मॅनेजरने सांगितले की,'डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत आहेत आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, राजू अजूनही व्हेंटिलेटरवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT