Shraddha Kapoor and Rahul Mody Saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO: श्रद्धा कपूर राहुल मोदीशी करणार लग्न? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Shraddha Kapoor: बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मोदींची सून होणार आहे. हे ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. नेमके मोदी कोण? हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, आम्ही तुमची उत्सुकता जास्त ताणणार नाही. श्रद्धा कपूरचा होणारा पती कोण आहे जाणून घेऊ..

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी शिंदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

श्रद्धा कपूर...बॉलिवूडची अभिनेत्री.. लाखो तरुणांचं क्रश... बॉलिवूडमधील कायम चर्चेत राहणारी श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे लाईमलाइटमध्ये आलीय. श्रद्धाने सोशल मीडियावर ती राहुल मोदीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिलीय. राहुल आणि श्रद्धा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या पण तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने अखेर लक्ष वेधून घेतलंय.

श्रद्धा - राहुलबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. अगदीच महिन्यभरापूर्वी ते दोघं एकत्र व्हेकेशनला गेल्याची चर्चा होती. एकाच लोकेशनवरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातच श्रद्धाने केलेल्या पोस्टमुळे अखेर एकप्रकारे श्रद्धाने तिच्या रिलेशनशिपची कबुली दिली असल्याचं म्हटलं जातंय.

श्रद्धाने सोशल मीडियावर तिचा आणि राहुलचा एक सेल्फी पोस्ट केला आणि त्याला 'दिल रख ले पर नींद तो वापस दे दे यार', असं कॅप्शन आणि हार्ट इमोजी शेअर केलाय. यामुळे तिने तिचं रिलेशनशिप कबूल केलं असल्याचं म्हटलं जातंय. तिची ही पोस्ट व्हायरल झाली असून अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं आहे.

व्हायरल सत्य

राहुल आणि श्रद्धा यांची ओळख 'तू झूठी में मक्कार' या सिनेमाच्या सेटवर झाली. राहुल हा लेखक असून आजवर त्याने बऱ्याच सिनेमांचं लेखन केलंय. गेला बराच काळ श्रद्धा आणि राहुल डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनीही रिलेशन बराच काळ खासगीत ठेवलं होतं.

श्रद्धा राहुलपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. अखेर ते त्यांचं रिलेशनशिप अधिकृत करणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी लग्नाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. हिरो हिरोईन हे चित्रपट रिलीज वेळी, असे स्टंट करत असतात. त्यामुळे श्रद्धा थेट लग्नाची घोषणा करेल तेव्हाच त्यावर विश्वास ठेवायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

Accident News : मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

Maharashtra Politics: ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT