Draupadi Movie Motion Poster Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Draupadi Movie : यज्ञसेनी कादंबरीवर येणार चित्रपट; 'द्रौपदी'चे मोशन पोस्टर प्रदर्शित

Draupadi Movie Poster Out : प्रख्यात लेखिका प्रतिभा रे यांच्या पुरस्कार विजेत्या ओडिया कादंबरी "यज्ञसेनीवर" आधारित आहे.

Pooja Dange

Actress Rukmini Maitra Bengali Movie on Mahabharat : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी रुक्मिणी मैत्रासोबत "द्रौपदी" हा चित्रपट तयार करणार असून बिनोदिनी-एकटी नातीर उपाख्यान, थिएटर लीजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित बंगाली बायोपिक नंतर हा त्यांचा दुसरा मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे.

देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाभारताची कथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सगळे एकत्र आले असून बंगालचे सुपरस्टार देव अधिकारी आणि मुंबईचे प्रतीक चक्रवर्ती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोहळा मीडियावर पार पडला आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रुक्मिणी मैत्रा ही द्रौपदीची मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट प्रख्यात लेखिका प्रतिभा रे यांच्या पुरस्कार विजेत्या ओडिया कादंबरी "यज्ञसेनीवर" आधारित आहे.

दिग्दर्शक राम कमल यांनी माझ्या प्रकाशक रुपा पब्लिकेशन्सच्या माध्यमातून यज्ञसेनीच्या चित्रपट हक्कांसाठी माझ्याशी संपर्क साधला. तेव्हा मला आनंद झाला की आजही भारतीय चित्रपट निर्मात्यांना महाभारताच्या कथेमध्ये रस आहे.

माझे पुस्तक, यज्ञसेनी, महाभारताच्या दृश्‍यातून 'यज्ञसेनी' या विषयावर आधारित आहे. यज्ञसेनी हे संयम, तपश्चर्या आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. हे एक सर्जनशील सहकार्य आहे आणि राम कमल स्वतः एक लेखक असल्याने यज्ञसेनी आणि त्यांच्या कथेला नक्कीच न्याय देतील.

मला वाटते की आम्ही आमच्या महाकाव्यांचे पुनरावृत्ती करण्यासाठी आणि नवीन पिढीला आपली संस्कृती आणि वारसा सांगण्यासाठी ही योग्य वेळी असल्याचे लेखिका प्रतिभा रे यांनी सांगितले . (Latest Entertainment News)

"बंगालची आघाडीची अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा म्हणते, "बिनोदिनी एक्ती नातीर उपाख्याननंतर राम कमलसोबत पुन्हा एकत्र येणे हे आनंददायक आहे, कारण त्यांनी मला पडद्यावर अत्यंत आव्हानात्मक पात्र साकारताना सुंदर वातावरण निर्माण करून काम सहजतेने करून घेतेले.

काम करताना तुम्हाला आनंद मिळणे, ही खूप मोठी गोष्ट असते. महाभारताचा एक भाग बनणे हा सन्मान आहे, हा विषय प्रत्येक भारतीयाच्या खूप जवळचा आहे.

पटकथा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कलाकार आणि तांत्रिक टीम निश्चित केली जाईल. या चित्रपटासाठी निदान चार महिने पूर्व-निर्मिती आणि कार्यशाळेची आवश्यकता आहे. हा चित्रपट बंगाली भाषेत तयार होणार असून संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT